India vs Bangladesh : पहिल्या वन डे सामन्यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने दुखापतीमुळे माघार घेतली आणि त्याच्याजागी उम्रान मलिकची संघात एन्ट्री झाली. हे सर्व सुरळीत होतंय असे वाटत असताना टीम इंडियाची चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली. भारताचा दुसरा गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) याला विचित्र अनुभव आला आणि त्या आता पहिली वन डे खेळणार कशी? असा सवालच केला...
रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यातला वाद खरा? रवी शास्त्रींच्या वक्तव्याने उडाली खळबळ; म्हणाले...
मोहम्मद शमीची माघार अन्..उद्या सामना अन् आज मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) मालिकेतून माघार घेतल्याची बातमी आली. सराव सत्र सुरू असताना शमीच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमच्या देखरेखीखाली उपचार घेतोय. त्यामुळे शमी तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत खेळणार नसल्याचे BCCI ने सांगितले आणि त्याच्याजागी उम्रान मलिकची वन डे संघात निवड झाली आहे.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, उम्रान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
बांगलादेशचा वनडे संघ - लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला.
वन डे मालिकेचे वेळात्रकपहिली वन डे - ४ डिसेंबर - ढाकादुसरी वन डे - ७ डिसेंबर- ढाकातिसरी वन डे - १० डिसेंबर - चत्ताग्राम वन डे मालिकेचे सामने सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होतील, तर कसोटीचे सामने सकाळी ९ पाहून खेळवण्यात येतील. सोन स्पोर्ट्स वर ही मालिका पाहता येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"