Join us  

IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

भन्नाट, अफलातून अन् सुपब...काय म्हणावं या कॅचला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:31 PM

Open in App

India vs Bangladesh, 1st Test, Day 3 : चेन्नईच्या मैदानात सुरु असलेल्या बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे.  भारतीय संघाने दिलेल्या ५१५ धावांच्या डोंगराऐवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या सलामीवीरांनी दुसऱ्या डावाची सुरुवात अगदी आत्मविश्वासाने केली.  झाकिर हसन (Zakir Hasan) आणि शादमान (Shadman Islam ) या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. पण बुमराह पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावातील १७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर बुमराहनं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. झाकीर ४७ चेंडूत  ३३ धावा करून माघारी फिरला. 

यशस्वी जैस्वालनं पकडला भन्नाट कॅच

 ही विकेट जसप्रीत बुमराहच्या खात्यात जमा झाली असली तरी त्याच खरं श्रेय हे यशस्वी जैस्वालला जाते. कारण त्याने गली (gully ) फिल्ड पोझीशनवर हा  कमालीचा झेल टिपत संघाच्या पहिल्या यशात मोलाचा वाटा उचलला. स्लीपमध्ये किंवा गलीमध्ये कॅच पकडणं ही सर्वात कठीण गोष्ट असते. बुमराहसारख्या गोलंदाजाने टाकलेल्या चेंडू ज्यावेळी बॅटची कड घेऊन स्लीमध्ये जातो त्यावेळी तो चेंडू पकडणं आणखी आव्हानात्मक होतं. डोळ्याची पापणी लवण्याच्या आत चेंडू फिल्डरपर्यंत पोहचत असतो. एवढ्या कमी वेळात चेंडूचा अंदाज घेऊन तो कॅरी करणं सोप नसतं. पण ही गोष्ट  जैयस्वालनं यशश्वी करून दाखवली. परिणामी बांगलादेशच्या खेळाडूला तंबूचा रस्ता धरावा लागला.

झाकीर हसन याच्या बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू गली फिल्ड पोजिशनवर उभा असलेल्या यशस्वीच्या डाव्या बाजूला होता. पण चेंडू खूप खाली असल्यामुळे हा झेल अधिक अवघड होता. पण यशस्वीनं सुपर टायमिंगसह जबरदस्त डाइव्ह मारत चेंडू जमिनीला लागण्याआधी तो कॅचमध्ये रुपांतरित केला. यशस्वीनं घेतलेला हा झेल इतका अप्रितम होता की, संघातील सहकारीही हा झेल पाहून आश्चर्यचकित झाले.  टीममधील सर्वच सहकाऱ्यांकडून या  अप्रतिम आणि यशस्वी झेलबद्दल जैस्वालच कौतुक केल्याचे पाहायला मिळालं. 

   

टॅग्स :यशस्वी जैस्वालजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघबांगलादेश