India vs Bangladesh : भारतीय कर्णधार रोहित शर्मा अंगठ्याला दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही. पण, रोहितची दुखापत बरी झाली असून तो दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत जर रोहित दुसरा कसोटी सामना खेळला तर त्याच्या जागी कोणता खेळाडू भारताच्या प्लेईंग XI मधून बाहेर बसेल. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जाफर म्हणाला, 'एक जुनी म्हण आहे की जेव्हा फलंदाज कामगिरी करत नाहीत तेव्हा गोलंदाजांना वगळले जाते, त्यामुळे गोलंदाज कमी करून फलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. माझ्या मते स्पिनरला दुसऱ्या कसोटीतून वगळले जाऊ शकते. शुभमन गिलने शानदार शतक झळकावले आहे, त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाणार नाही. गिल मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो. गिलला पाचव्या क्रमांकावर खेळवल्यास तो योग्य ठिकाणी असेल.
माजी भारतीय क्रिकेटपटू पुढे म्हणाला, 'रोहितच्या आगमनानंतर आर अश्विन आणि अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. पहिल्या डावात अश्विनला विकेट घेता आली नाही. त्याच वेळी, अक्षरने देखील प्रभाव पाडला नाही. अशा परिस्थितीत व्यवस्थापनाने रोहितचा समावेश करून गोलंदाजाला बाद करण्याचा विचार केला तर तो अक्षर असू शकतो.
दरम्यान, पहिल्या कसोटीत बांगलादेशचे फलंदाज चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच गुडघे टेकतील असे वाटले होते. पण, जाकिर हसन व नजमूल शांतो ( ६७) यांनी दमदार खेळ केला. पण, लंच ब्रेकनंतर उमेश यादवने भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. नजमूल व हसन यांनी पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्ध ही चौथ्या डावात सलामीवीरांची चौथी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी ए रे व जे स्टो लमेयर ( वेस्ट इंडिज, १९५३) यांनी नाबाद १४२, एम हॉर्न-जी स्टीड ( न्यूझीलंड, १९९९) यांनी १३१ आणि जे बिंक्स-बी बोलूस ( इंग्लंड, १९६४) यांनी १२५ धावांची भागीदारी केली होती. अक्षर पटेलने दुसरा धक्का देताना यासीर अलीला ५ धावांवर त्रिफळाचीत केले. लिटन दासही १९ धावांवर बाद झाला अन् बांगलादेशची अवस्था ७१ षटकांत ३ बाद १७६ अशी झाली आहे. जाकिर हसन ८२ धावांवर खेळतोय.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: IND vs BAN : KL Rahul Or Shubman Gill, Whom Does Returning Rohit Sharma Replace In 2nd Test? Wasim Jaffer Answers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.