Join us  

IND vs BAN Live: टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळणे अडचणीत; बांगलादेशने बिघडवले गणित! 

 India vs Bangladesh, 2nd Test: सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 10:19 AM

Open in App

नवी दिल्ली : सध्या बांगलादेशच्या धरतीवर भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. आज दुसऱ्या सामन्यातील अखेरचा दिवस आहे. खरं तर ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून भारतासाठी महत्त्वाची आहे. 55.77 गुणांच्या टक्केवारीसह भारत सध्या WTC पॉइंट टेबलवर दुसऱ्या क्रमांकावर आहे.  मात्र दुसऱ्या सामन्यात आताच्या घडीला यजमान संघाची मजबूत पकड आहे.

त्यामुळे जर भारताने हा सामना गमावल्यास भारत 51.7 गुणांवर घसरेल आणि चौथ्या स्थानावर घसरण होईल. तसेच भारतीय संघ जिंकल्यास ते 58.9 च्या गुणांसह त्यांचे दुसरे स्थान मजबूत करतील. लक्षणीय बाब म्हणजे भारताने आजचा सामना गमावला तर संघाला कोणत्याही परिस्थितीत उरलेले चारही सामने जिंकावे लागतील. जर भारताने बांगलादेशला हरवल्यानंतर ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत केले तर त्यांचे गुण 62.5 होतील आणि टीम इंडिया सहजपणे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. 

यजमानांचे शानदार पुनरागमन 

दुसऱ्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा करून सामन्यांत 87 धावांची आघाडी घेतली होती. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे संघ मजबूत स्थितीत होता. 

बांगलादेशची फलंदाजी दुसऱ्या डावात देखील अयशस्वी ठरली. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून यजमानांना केवळ 231 धावांवर रोखले. खरं तर भारतासमोर विजयासाठी 227 धावांचे लक्ष्य होते. मात्र बांगलादेशी गोलंदाजांनी देखील आपल्या चाहत्यांना जागे करत भारताला धक्के दिले. भारताचे ४ गडी स्वस्तात माघारी परतले.  

भारताचे फलंदाज ठरले अयशस्वी भारताच्या दुसऱ्या डावात यजमानांनी बाजी मारली. भारताकडून अक्षर पटेल वगळता कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. लोकेश राहुल (2), शुबमन गिल (7), चेतेश्वर पुजारा (6), अक्षर पटेल (34), विराट कोहली (1), जयदेव उनाडकड (13) आणि रिषभ पंत (9) धावा करू माघारी परतला. 

दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

दुसऱ्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ - शाकिब अल हसन (कर्णधार) नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशलोकेश राहुलरिषभ पंतबांगलादेशअक्षर पटेल
Open in App