Join us  

IND vs BAN Live: बांगलादेशने भारताची धाकधुक वाढवली; यजमानांची विजयाच्या दिशेने वाटचाल, वाचा सविस्तर

India vs Bangladesh, 2nd Test: सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 9:57 AM

Open in App

नवी दिल्ली : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतली आहे. आज दुसऱ्या सामन्यातील अखेरचा दिवस आहे. मात्र, यजमान बांगलादेशच्या संघाने भारतीय संघाची धाकधुक वाढवली असून सामन्यात मजबूत पकड बनवली आहे. आताच्या घडीला भारताला विजयासाठी 64 धावांची गरज आहे, तर यजमान संघाला मालिका बरोबरीत ठेवण्यासाठी 3 बळी घेणे आवश्यक आहे. भारतीय संघाची 34 षटकांपर्यंत 7 बाद 81  एवढी धावसंख्या आहे. भारताकडून श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन खेळपट्टीवर टिकून आहेत. 

तत्पुर्वी, या सामन्यात बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 314 धावा करून सामन्यात 87 धावांची आघाडी घेतली होती. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे संघ मजबूत स्थितीत होता. 

बांगलादेशी गोलंदाजांचे वर्चस्व 

बांगलादेशची फलंदाजी दुसऱ्या डावात देखील अयशस्वी ठरली. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करून यजमानांना केवळ 231 धावांवर रोखले. खरं तर भारतासमोर विजयासाठी 227 धावांचे लक्ष्य होते. मात्र बांगलादेशी गोलंदाजांनी देखील आपल्या चाहत्यांना जागे करत भारताला धक्के दिले. भारताचे ४ गडी स्वस्तात माघारी परतले.  बांगलादेशकडून महेदी हसनने सर्वाधिक 5 बळी पटकावले. 

भारताच्या दुसऱ्या डावात यजमानांनी बाजी मारली. भारताकडून अक्षर पटेल वगळता कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. लोकेश राहुल (2), शुबमन गिल (7), चेतेश्वर पुजारा (6), अक्षर पटेल (34), विराट कोहली (1), जयदेव उनाडकड (13) आणि रिषभ पंत (9) धावा करू माघारी परतला. 

दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

दुसऱ्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ - शाकिब अल हसन (कर्णधार) नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघलोकेश राहुलअक्षर पटेलश्रेयस अय्यर
Open in App