Join us  

IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...

ind vs ban 1st test : रिषभ पंतने शतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 3:35 PM

Open in App

rishabh pant century in test : बांगलादेशविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून रिषभ पंत आणि शुबमन गिल यांनी शतकी खेळी केली. भारताने आपल्या पहिल्या डावात ३७६ धावा केल्यानंतर पाहुणा बांगलादेशचा संघ त्यांच्या पहिल्या डावात अवघ्या १४९ धावा करू शकला. मग टीम इंडियाने दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारुन बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले. रिषभ पंतने ४ षटकार आणि १३ चौकारांच्या मदतीने १२८ चेंडूत १०९ धावांची शतकी खेळी केली. पंतच्या शतकानंतर त्याची गर्लफ्रेंड ईशा नेगीने आनंद व्यक्त केला.

खरे तर ईशाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक बोलकी प्रतिक्रिया दिली. कृतज्ञ, आभारी आणि धन्य अशा तीन शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली. चाहते ईशाच्या या स्टोरीला पंतच्या शतकी खेळीशी जोडत आहेत. 

रिषभ पंत आपल्या वैयक्तिक जीवनाबाबतच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो. पंत गेल्या काही वर्षांपासून ईशा नेगी हिला डेट करत आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त पंतने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा फोटो पोस्ट करत तिला खास शुभेच्छा दिल्या होत्या. २०१९ या वर्षांच्या सुरुवातीला रिषभ पंतने सोशल मीडियावर ईशा नेगीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या दरम्यान दोघेही सुट्टीवर होते. त्यानंतर पंतने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली. ईशा नेगी ही मूळची उत्तराखंडमधील देहरादूनची आहे. ती व्यवसायाने इंटिरियर डिझायनर आहे. ईशा नेगी तिच्या ग्लॅमरस लूकसाठी इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.

ईशा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेकदा स्टायलिश फोटो शेअर करत असते. काही पोशाख पाश्चिमात्य असतात तर काही वेळा ती पारंपारिक पोशाखातही फोटो पोस्ट करते. ईशा बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच सुंदर आहे. ईशाचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ ला देहरादूनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात झाला. ईशा श्रीमंत राजपूत कुटुंबातून असून तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत. Fab X इंजिनिअरिंग असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे. ईशाचे शालेय शिक्षण देहरादूनमधील एका कॉन्व्हेंट शाळेत तर नॉयडाच्या अमिटी महाविद्यालयातून ती कला शाखेची पदवीधर आहे.

टॅग्स :रिषभ पंतभारत विरुद्ध बांगलादेशऑफ द फिल्डदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट