India vs Bangladesh : India tour of Bangladesh - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संपल्यानंतर आता द्विदेशीय मालिकांचे सत्र सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात आता मालिका सुरूच आहे. भारतीय संघ तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि उद्या या दौऱ्यातील पहिला वन डे सामना खेळवला जाणार आहे. पण, तत्पूर्वी, भारताला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाजाने दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून माघार घेतली आहे.
- भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
- भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
- बांगलादेशचा वनडे संघ - लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला.
मोहम्मद शमीची माघार...वर्ल्ड कप स्पर्धेतून भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला बांगलादेश दौऱ्यातून हाताच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. PTI ने या संदर्भातले वृत्त दिले आहे आणि BCCI ने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. शमीचा कसोटी व वन डे संघात समावेश आहे, परंतु त्याचे कसोटी खेळणेही अनिश्चित आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधीच्या मालिकेतही कोरोना झाल्यामुळे शमीला माघार घ्यावी लागली होती.
वन डे मालिकेचे वेळात्रक
- पहिली वन डे - ४ डिसेंबर - ढाका
- दुसरी वन डे - ७ डिसेंबर- ढाका
- तिसरी वन डे - १० डिसेंबर - चत्ताग्राम
कसोटी मालिका
- पहिली कसोटी - १४ ते १८ डिसेंबर, चत्तोग्राम
- दुसरी कसोटी - २२ ते २६ डिसेंबर, ढाका
वन डे मालिकेचे सामने सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होतील, तर कसोटीचे सामने सकाळी ९ पाहून खेळवण्यात येतील. सोन स्पोर्ट्स वर ही मालिका पाहता येणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"