Join us  

३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड

३०० विकेट्स आणि ३००० धावा अशी कामगिरी करण्याचा महा पराक्रमासह रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 2:25 PM

Open in App

Ravindra Jadeja Record : भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजानं कानपूर कसोटी सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ग्रीन पार्कच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात एक विकेट्स घेताच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्सचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा भारताचा तो सातवा आणि पहिला लेफ्ट आर्म स्पिनर आहे. एवढेच नाही तर ३०० विकेट्स आणि ३००० धावा अशी कामगिरी करण्याचा महा पराक्रमही त्याच्या नावे झाला आहे. 

सर्वात जलद गतीने ३०० विकेट्स अन् ३००० धावांचा पल्ला गाठणारा दुसरा

रवींद्र जडेजानं आपल्या ७४ व्या कसोटी सामन्यात या प्रकारात ३०० विकेट्सचा पल्ला गाठला. बॅटिंगमध्ये त्याच्या खात्यात ३१२२ धावांची नोंद आहे. कसोटीत ३०० विकेट्स आणि ३००० धावा अगदी जलदगतीने करण्याचा विक्रम हा इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटर इयान बॉथम यांच्या नावे आहे. त्यांनी ७२ सामन्यात ३०५ विकेट्स आणि ४१५३ धावा केल्या होत्या. जड्डूनं या रेकॉर्ड्सच्या बाबतीत इम्रान खान, कपिल देव आणि रिचर्ड हेडली या दिग्गजांना मागे टाकले आहे. 

कसोटीत ३०० विकेट्स अन् ३००० धावा अशी कामगिरी करणारे खेळाडू

  • इयॉन बॉथम ७२ कसोटी सामन्यानंतर ३०५ विकेट्स ४१५३ धावा
  • इम्रान खान- ७५  कसोटी सामन्यानंतर  ३४१ विकेट्स अन् ३००० धावा
  • कपिल देव ८३ कसोटी सामन्यानंतर  ३०० विकेट्स ३४८६ धावा
  • रिचर्ड हेडली ८३ कसोटी सामन्यानंतर  ४१५ विकेट्स ३०१७ धावा
  • शॉन पॉलाक ८७ कसोटी सामन्यानंतर ३५३ विकेट्स आणि ३००० धावा
  • आर अश्विन ८८ कसोटी सामन्यानंतर  ४४९ विकेट्स आणि ३०४३ धावा
  • डॅनियल व्हिक्टोरी ९४ कसोटी सामन्यानंतर  ३०३ धावा३४९२
  • चमिंडा वास १०८ कसोटी सामन्यानंतर ३५१ विकेट्स आणि ३०५० धावा
  • स्टुअर्ट ब्रॉड १२१ कसोटी सामन्यानंतर ४२७ विकेट्स आणि ३००८ धावा
  • शेन वॉर्न १४२ कसोटी सामन्यानंतर  ६९४ विकेट्स आणि ३०१८ धावा

टॅग्स :रवींद्र जडेजाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश