बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चेन्नईच्या मैदानात रवींद्र जडेजानं अष्टपैलू खेळीचा नजराणा पेश केला. आता या क्रिकेटरला दुसऱ्या कसोटी सामन्यात खास विक्रम खुणावतो आहे. एक मोठा आणि मैलाचा पल्ला गाठण्यासाठी त्याला फक्त एक विकेट हवी आहे. कानपूरच्या मैदानात पहिली विकेट खात्यात जमा करताच रवींद्र जेडेजा खास विक्रमासह एलिट लिस्टमध्ये एन्ट्री मारेल. जाणून घेऊयात त्याला खुणावत असलेल्या विक्रमाबद्दलची खास स्टोरी
३०० चा टप्पा पार करत खास विक्रमाला गवसणी घालण्याची संधी चेन्नई कसोटी सामन्यात रवींद्र जडेजानं पहिल्या डावात संघ अडचणीत असताना ८६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. एवढेच नाही तर गोलंदाजी करताना त्याने या सामन्यात ५ विकेट्सही घेतल्या. आता तो ३०० विकेट्सच्या उंबरठ्यावर आहे. कानपूर कसोटी सामन्यात एक विकेट पटकवाच तो या कामगिरीसह खास क्लबमध्ये सामील होईल.
असा पराक्रम करणारा ठरेल तिसरा गोलंदाज
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात एक विकेट घेताच ३००० हजार धावांसह ३०० विकेट्सचा पल्ला गाठणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरेल. ज्यामुळे तो कपिल देव आणि आर अश्विन यांच्या एलिट लिस्टमध्ये सामील होईल.
३०० विकेट्स प्लस ३००० धावा करणारे अन्य खेळाडू भारताच्या खेळाडूंशिवाय क्रिकेट जगतात अन्य ८ खेळाडूंनी ३०० विकेट्स आणि ३००० धावांचा पल्ला गाठला आहे. या यादीत इयान बॉथम, शेन वॉर्न, इम्रान खान, स्टुअर्ट ब्रॉड, रिचर्ड हेडली, डॅनियल व्हिक्टोरी, शॉन पोलक आणि चमिंडा वास या दिग्गजांचा समावेश आहे.
जडेजाची कसोटीतील कामगिरी
चेन्नईच्या खेळपट्टीच्या तुलनेत कानपूरची खेळपट्टी अधिक संथ असेल, असा अंदाज आहे. या परिस्थितीत रवींद्र जडेजा प्रतिस्पर्धी संघासाठी आणखी घातक ठरू शकतो. त्यामुळे त्याला हा खास टप्पा गाठणं अधिक सोपे होईल, असे दिसते. रवींद्र जडेजा याने ७३ कसोटी सामन्यातील १३८ डावात २९९ विकेट्स घेतल्या आहेत. ४२ धावांत ७ विकेट्स ही त्याची कसोटीतील बेस्ट कामगिरी आहे. बॅटिंगमध्ये त्याने १०६ डावात ४ शतके आणि २१ अर्धशतकाच्या मदतीने ३१२२ धावा केल्या आहेत.