चेन्नई कसोटी सामन्यात आपल्या शतकी खेळीशिवाय रिषभ पंतनंबांगलादेशची फिल्ड सेट करुन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याची ही गोष्ट कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याची जोरदार चर्चाही रंगली. आता खुद्द रिषभ पंतनं त्यामागची अनटोल्ड स्टोरी शेअर केली आहे. प्रतिस्पर्धी संघाला फिल्ड सेट करण्यात मदत करण्यामागचं कारण सांगत त्याने आपल्यातील खिलाडूवृत्तीच आगळं वेगळ रुप दाखवून दिले आहे.
सुपर कमबॅकनंतर बीसीसीआयने शेअर केला पंतचा खास व्हिडिओ
एमए चिदम्बरम स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने २३० धावांनी धमाकेदार विजय नोंदवला. त्यानंतर आता बीसीसीआयने या सामन्यातून धमाकेदार कमबॅक करणाऱ्या रिषभ पंतचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हि़डिओमध्ये पंत जवळपास २० वर्षानंतर कमबॅकचा अनुभव कसा राहिला, ते सांगताना दिसून येते. पंतनं शेअर केली त्या सीनमागची मनातली गोष्ट
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओच्या अखेरीस रिषभ पंत बांगलादेशच्या संघाला फिल्ड सेट करण्यात मदत करण्यासंदर्भातील मुद्यावर भाष्य करताना दिसून येते. तो म्हणतो की, " कुठंही खेळत असताना क्रिकेटचा दर्जा उत्तम असावा, असे मला वाटते. या गोष्टीला महत्त्व देत असल्यामुळेच बांगलादेशच्या संघाने कुठं क्षेत्ररक्षण लावायला हवं, त्यासंदर्भात सल्ला दिला. ही गोष्ट खरंच भन्नाट होती. यातून मिळालेला आनंद खूप वेगळा होता." असे पंतनं म्हटले आहे.
धोनीला ओव्हरटेक करण्यासाठी हवं आहे फक्त एक शतक
चेन्नई कसोटी सामन्यात पहिल्या डावात पंत लयीत दिसला. पण मोठी खेळी करण्यात त्याला यश आले नाही. तो ३७ धावांवर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने सर्व उणीव भरून काढत कमबॅक कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याच्या शतकी खेळीला बांगलादेशचा कर्णधार शांन्तोनं हातभारही लावला. कारण त्याने ७२ धावांवर पंतचा एक सोपा झेल सोडला होता. त्यानंतर रिषभ पंतनं १०९ धावांची खेळी करत महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक झळकवणाऱ्या विकेट किपर बॅटरमध्ये धोनीसोबत तो संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे. आगामी कसोटी मालिकेत तो धोनीला ओव्हरटेक करून नंबर वन होईल, यात शंका नाही.