Join us  

आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)

पंत चक्क बांगलादेशच्या संघाची फिल्डिंग सेट करताना दिसला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:22 PM

Open in App

बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्यात शुबमन गिल आणि रिषभ पंत यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने आपली आघाडी ४०० + धावांची केली आहे. जवळपास दोन वर्षानंतर कसोटी संघात परतलेल्या रिषभ पंतने आपल्या जुन्या अंदाजातील फटकेबाजीचा नजराणा पेश करत चाहत्यांच्या डोळ्याचे पारणं फेडलं. पंत मैदानात असला की, त्याच्या खेळीशिवाय त्याचा हटके अंदाज चर्चेचा विषय ठरतो. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवसांपासूनच पंतचा हटके अंदाज चर्चेत आहे. त्यात नव्या व्हिडिओची भर पडलीये. तो चक्क बांगलादेशच्या संघाची फिल्डिंग सेट करताना दिसला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

आधी आयकॉनिक वन हँड सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ३९ धावांवर अडखळलेल्या रिषभ पंतनं दुसऱ्या डावात मोठ्या खेळीचा डाव साधला. आपल्या भात्यातील आयकॉनिक वन हँड सिक्सरसह त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. इथपर्यंत पोहचण्यासाठी त्याने ८८ चेंडूंचा सामना केला. त्याच्या भात्यातील वन हँड शॉट हा  पुन्हा पुन्हा चाहत्यांना त्याच्या फटकेबाजीच्या प्रेमात पाडणारा आहे. तो सीन पुन्हा पाहायला मिळाला. एका बाजूला हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीला उतरत असताना पंत बांगलादेशची फिल्डिंग सेट करत असल्याचा व्हिडिओ समोर आला. या गोष्टीचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.   मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत

शुबमन गिल आणि रिषभ पंत या जोडीनं बांगलादेशच्या संघाचे अक्षरश:  खांदे पाडले. त्यांना रोखण्यासाठी फिल्डिंग कशी लावावी हेच बांगलादेशच्या कॅप्टनला सुचेना असा सीन क्रिएट झाला होता. दरम्यान रिषभ पंत बॅटिंग करताना स्टान्स घेण्याआधी बांगलादेश संघाची फिल्डिंग सेट करताना दिसला. एक फिल्डर इकडेही लाव असा सल्ला त्याने प्रतिस्पर्धी संघाला दिला. गोलंदाज आणि बांगलादेशी कॅप्टन यांनी पंतची गोष्ट ऐकली आणि त्याने सांगितलेल्या जागी क्षेत्ररक्षणही लावलं. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय.    

 

 

टॅग्स :रिषभ पंतभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश