रोहित-विराटसह टीम इंडियातील मंडळी चेन्नईत पोहचली; इथं पाहा खेळाडूंची खास झलक

मोठ्या ब्रेकनंतर भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:05 AM2024-09-13T11:05:17+5:302024-09-13T11:08:57+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN Rohit Sharma And Virat Kohli have reached Chennai for the first Test against Bangladesh | रोहित-विराटसह टीम इंडियातील मंडळी चेन्नईत पोहचली; इथं पाहा खेळाडूंची खास झलक

रोहित-विराटसह टीम इंडियातील मंडळी चेन्नईत पोहचली; इथं पाहा खेळाडूंची खास झलक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोठ्या ब्रेकनंतर भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुन्हा मैदानात उतरणार आहे. चेन्नईच्या मैदानात रंगणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील सदस्य चेन्नईला पोहचले आहेत. चेन्नई विमानतळावर शुक्रवारी कर्णधार रोहित शर्मासहविराट कोहलीची खास झलक पाहायला मिळाली.  

कॅज्युअल लूकमध्ये दिसला हिटमॅन रोहित 

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा चेन्नई विमानतळावरील लूक समोर आला आहे. सोशल मीडियावर त्याच्या चेन्नईतील एन्ट्रीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात हिटमॅन येलो टी शर्ट आणि जीन्ससह परफेक्ट कॅज्युअल लूकमध्ये अगदी तोऱ्यात चेन्नईत दाखल झाल्याचे दिसून येते.

विराट कोहलीचा अंदाजही एकदम झक्कास

कॅप्टन रोहित शर्माशिवाय स्टार बॅटर विराट कोहलीही चेन्नईत पोहचला आहे. तोही विमानतळावर परफेक्ट स्टायलिश कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला. विराट कोहली याआधी श्रीलंका दौऱ्यावरील वनडे मालिकेत दिसला होता. ही मालिका त्याच्यासाठी काही खास राहिली नव्हती. त्यानंतर तो पत्नी अनुष्कासोबत लंडनला क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसले. आता बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातून तो पुन्हा एकदा आपली खास छाप सोडण्यासाठी तयार आहे.    

बुमराहसह, पंत अन् केएल राहुलचीही दिसली झलक

चेन्नईच्या विमानतळावर रोहित-विराटशिवाय भारतीय संघातील अन्य स्टार खेळाडूही स्पॉट झाले. यात जसप्रीत बुमराहची झलकही पाहायला मिळाली. लोकेश राहुल आणि रिषभ पंत ही एका फ्रेममध्ये दिसली. रिषभ पंत हा २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. आता तो मोठ्या अंतरानंतर पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातून व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये परततोय. लोकेश राहुलन दुलिप करंडक स्पर्धेतील अप्रतिम खेळीसह टीम इंडियात एन्ट्री मारली आहे. ही मंडळी पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील, हे जवळपास निश्चित आहे. 
 

Web Title: IND vs BAN Rohit Sharma And Virat Kohli have reached Chennai for the first Test against Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.