IND vs BAN Sanju Samson Hits Five Consecutive Sixes In Rishad Hossain Over :भारताचा विकेट किपर बॅटर संजू सॅमसन (Sanju Samson) याने सलामीवीराच्या रुपात मिळालेल्या संधीच सोनं करून दाखवलं. हैदराबादच्या मैदानात त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा अक्षरश: बुक्का पाडला. पहिल्या दोन सामन्यातील कसर भरून काढत त्याने पाहुण्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं.
संजूच्या भात्यातून पाहायला मिळाली चौकार-षटकारांची आतषबाजी
हैदराबादच्या राजीव गांधी मैदानात रंगलेल्या सामन्यात संजू सॅमसन याने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावले. ४० धावांत हा पल्ला गाठत त्याने फास्टर सेंच्युरी मारणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये एन्ट्रीही मारली. पण या सामन्यात त्याने एका गोलंदाजाला लय वाईट धुतलं. तो गोलंदाज म्हणजे फिरकीपटू रिशाद हुसेन. एका षटकात झालेली धुलाई तो आयुष्यभर विसरणार नाही.
६,६,६,६,६... एका षटकात कुटल्या ३० धावा
सॅमसन तुफान फटकेबाजी करत असताना भारताच्या डावातील १० व्या षटकात बांगलादेशचा कर्णधार हुसेन शान्तो यानं रिशादच्या हाती चेंडू सोपवला. या षटकात संजू सॅमसन याने सलग पाच षटकार मारले. तो एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारायला भलेही चुकला असेल पण त्याने बांगलादेशचा गोलंदाज त्याने केलेली ही धुलाई कधीच विसरणार नाही. एवढच नाही तर भारतीय चाहते आणि खुद्द संजू सॅमसनसाठीही हे षटक अविस्मरणीय असेच ठरले.
पेश केला भात्यातील फटकेबाजीचा खास नजराणा
रिशादनं पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. पण त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूपासून संजून आपल्या भात्यातील एक से बढकर एक फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्याची फटकेबाजी तमाम क्रिकेट रसिकांच्या डोळ्याच पारणं फेडणारी होती