नवी दिल्ली : 4 डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिकेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ बांगलादेशच्या धरतीवर वनडे आणि कसोटी मालिका खेळेल. आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शाकिब अल हसनचे बांगलादेशच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशच्या संघाची कमान तमीम इक्बालच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. मात्र मालिका तोंडावर असतानाच यजमान संघाला मोठा झटका बसला आणि कर्णधारच संघाबाहेर झाला. मात्र आता भारतीय संघाला कडवी झुंज देण्यासाठी बांगलादेशने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
दरम्यान, आगामी भारताविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशच्या संघाची धुरा लिटन दासच्या खांद्यावर असणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तमाम इक्बाल आगामी वनडे मालिकेतून बाहेर झाल्यामुळे बांगलादेशने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
बांगलादेशचा वनडे संघ - लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहिम, नझमुल हुसैन शांतो, महमुदुल्लाह, नुरूल हसन, अफिफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिझूर रहमान, हसन महमूद, इबादोत हुसैन, नसुम अहमद, महमुदुल्ला.
बांगलादेशविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, ईशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
भारताच्या बांगलादेश दौऱ्याचे वेळापत्रक
- 1 डिसेंबर - भारतीय संघ बांगलादेशला पोहचेल
- 4 डिसेंबर - पहिला वनडे सामना, ढाका
- 7 डिसेंबर - दुसरा वनडे सामना, ढाका
- 10 डिसेंबर - तिसरा वनडे सामना, ढाका
- 14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
- 22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
- 27 डिसेंबर - भारतीय संघ मायदेशी परतण्यासाठी रवाना होईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"