Join us  

IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी

विराट कोहलीच्या भात्यातून धावांची बरसात होईल, अशी भविष्यवाणी ३७ वर्षीय माजी क्रिकेटरनं केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:36 AM

Open in App

Suresh Raina Made Predictions About Virat Kohli : विराट कोहली जवळपास ९ महिन्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहे. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात किंग कोहलीला अनेक विक्रम खुणावत आहेत. तो मैदानात उतरला की, धावांची बरसात करावी, अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. अगदी हीच इच्छा सुरेश रैनालाही आहे. आगामी कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी माजी क्रिकेटर आणि सध्या समालोचकाच्या रुपात दिसणाऱ्या सुरेश रैनानं कोहलीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. 

पुन्गा विराटवर असतील सर्वांच्या नजरा 

विराट कोहलीच्या भात्यातून धावांची बरसात होईल, अशी भविष्यवाणी ३७ वर्षीय माजी क्रिकेटरनं केली आहे. आगामी कसोटी मालिकेसंदर्भात रैना म्हणाला की, ''रोहित शर्मा एक सर्वोत्तम कॅप्टन आहे. त्याने ते सिद्ध करून दाखवलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. पण यावेळी कसोटी मालिकेत सर्वांच्या नजरा या विराट कोहलीच्या कसोटीतील कमबॅकवर असतील. कोहलीला कसोटीमध्ये आणखी भारी खेळतो. तो या क्रिकेट प्रकारचा सन्मानही करतो.''

तो धावांची बरसात करेल; रैनाची मोठी भविष्यवाणी

रैना असेही म्हणाला की, "वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलआधी टीम इंडियाला एकूण १० कसोटी सामने खेळायचे आहेत. या आगामी सामन्यात विराट कोहलीच्या भात्यातून खूप धावा आल्याचे पाहायला मिळेल. आगामी काळात टीम इंडिया बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. प्रतिस्पर्धी संघातील आव्हानात्मक गोलंदाजीसमोर विराट कोहली आणखी चमकतो. ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल."

पाकच्या हॅरिस रौफचा दाखला देत रैनानं मांडल 'विराट' मत  

कोहली दबावामध्ये सर्वोत्तम खेळी करण्यात माहिर आहे. त्यामुळेच आगामी स्पर्धेत तो केंद्रस्थानी असेल. प्रतिस्पर्धी संघात निश्चितच मजबूत बॉलिंग लाइनअप आहे. पण विराट कोहलीनं पाकच्या हॅरिस राउफ सारख्या गोलंदाजासमोर आपली क्षमता दाखवून दिली आहे. आव्हानात्मक गोलंदाजीसमोर खेळायला तो नेहमी तयार असतो. मला खात्री आहे की, आगामी मालिकेत त्याचा जलवा पाहायला मिळेल, असा विश्वास सुरेश रैनानं व्यक्त केला आहे. 

टॅग्स :विराट कोहलीसुरेश रैनाभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश