Join us  

IND vs BAN: Sanju Samson, रिषभ, इशान यांचा चॅप्टर क्लोज! लोकेश राहुलच्या विधानानं युवा यष्टिरक्षकांना दिला इशारा

IND vs BAN ODI: KL Rahul wicketkeeping : आयसीसी २०२३ वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात झाली आहे. इशान किशन, संजू सॅमसन आणि रिषभ पंत हे शर्यतीत आहेत. पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 11:39 AM

Open in App

IND vs BAN ODI: KL Rahul wicketkeeping : आयसीसी २०२३ वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात झाली आहे. इशान किशन, संजू सॅमसन आणि रिषभ पंत हे शर्यतीत आहेत. पण, उप कर्णधार लोकेश राहुल याने वन डे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रांकवर फलंदाजी आणि यष्टिरक्षकाची भूमिका निभावण्याचे जाहीर केले आहे. संघात अधिकाधिक अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यासाठी रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात हा प्रयोग केला. रोहितच्या या प्रयोगामुळे इशान, संजू व रिषभ यांच्या वन डे वर्ल्ड कप खेळण्याच्या स्वप्नांच्या आशेचा चुराडा होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेत रिषभने माघार घेतल्यानंतर इशानला संधी मिळेल असे वाटत असताना कॅप्टन रोहितने यष्टिंमागे लोकेशला उभे केले.

India New T20 Coach: राहुल द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची वेळ आली; MS Dhoniसह तीन खेळाडूंमध्ये शर्यत लागली“गेल्या ६-७ महिन्यांत आम्ही जास्त वन डे सामने खेळलेलो नाहीत. पण २०२०-२१ पासून पाहिल्यास, मी यष्टिरक्षण केले आहे आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. संघाने मला ही भूमिका सोपवली आहे. पंतच्या  माघारीमागे नेमके कारण मला माहीत नाही. पंतने माघार का घेतली हे वैद्यकीय पथक सांगू शकेल,” असे राहुलने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जर लोकेशने ही भूमिका कायम ठेवली तर भारताच्या तीन यष्टीरक्षकांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही. संघ व्यवस्थापन सूर्यकुमार यादवला सहभागी करून घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळे, जर लोकेशने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली तर संजू सॅमसन, इशान किशन आणि रिषभ पंत हे बॅकअप यष्टिरक्षकांसाठीच स्पर्धा करतील आणि राहुल जखमी झाला तरच त्यांना खेळायला मिळेल. 

  • लोकेश राहुल तंदुरुस्त असल्यास वन डे क्रिकेटमध्ये यष्टिंमागे तोच दिसण्याची शक्यता अधिक आहे
  • शिखर धवनचा फॉर्मा पाहता संघ व्यवस्थापन त्याला कायम ठेवेल आणि रोहितसह ओपनिंगला पाठवतील,
  • अशा परिस्थितीत संजू सॅमसन, इशान किशन व रिषभ पंत हे राखीव यष्टिरक्षकाच्या शर्यतीत दिसतील
  • लोकेश राहुल किंवा शिखर धवन यांच्यापैकी कोणाला विश्रांती दिली किंवा दुखापत झाली, तरच यांना संधी मिळेल
  • अशातही रिषभ पंतचे पारडे जडच आहे, कारण संघ व्यवस्थापनाचे पारडे त्याच्याच बाजूने आहे

 

 

दरम्यान,  राहुलने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात पंतची जागा घेतली. शिखर धवनने रोहित शर्मासोबत सलामी दिली. पण श्रेयस अय्यरला राहुलच्या पुढे चौथा क्रमांक मिळाला. पण ट्वेंटी-२० मधील संघर्षानंतर भारतीय उपकर्णधार लोकेशने ७३ धावा केल्या.   

“ हा त्या दिवसांपैकी एक दिवस होता जेव्हा मी इतर सर्वांपेक्षा बॉलला चांगले टायमिंग करत होतो. मी खेळलेला प्रत्येक शॉट आणि मी घेतलेले पर्याय आज माझ्या कामी आला. बांगलादेशात नेट सत्रांमध्येही मी शॉट्सवर काम करत आहे. या खेळपट्टीवर मी स्वतःला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आणि मी माझ्या खेळीने खूश आहे. मी आज फलंदाजीचा आनंद लुटला. पण आम्हाला आणखी ३०-४० धावा करता आल्या असत्या तर आवडलं असतं.  मी जास्त वेळ टिकून राहू शकलो असतो आणि आमची धावसंख्या २३०-२४० पर्यंत नेली असती,” असे राहुल म्हणाला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशलोकेश राहुलइशान किशनसंजू सॅमसनरिषभ पंत
Open in App