WTC मध्ये भारताकडून रोहित शर्माचा दबदबा! इथं पाहा त्याची जबरदस्त आकडेवारी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणाऱ्या आगामी कसोटी मालिकेत रोहित आणि विराटच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 05:51 PM2024-09-13T17:51:44+5:302024-09-13T17:52:10+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN Test Why Rohit Sharma has been India's best batsman in World Test Championship since 2019 | WTC मध्ये भारताकडून रोहित शर्माचा दबदबा! इथं पाहा त्याची जबरदस्त आकडेवारी

WTC मध्ये भारताकडून रोहित शर्माचा दबदबा! इथं पाहा त्याची जबरदस्त आकडेवारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा भारतीय संघ फायनल खेळेल, अशी आशा आहे. या शर्यतीत टीम इंडिया आघाडीवर असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया क्रिकेटच्या पंढरीत पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी प्रयत्नशील असेल. पहिल्या दोन हंगामात भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली. पण आधी न्यूझीलंड आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला होता.  

४ महिन्यात १० कसोटी सामने

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या प्रवासात भारतीय संघ पुढील ४ महिन्यात १० कसोटी सामने खेळणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनं याची सुरुवात होईल. मोठ्या विश्रांतीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरत आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असणाऱ्या आगामी कसोटी मालिकेत रोहित आणि विराटच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील. २०१९ पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताकडून रोहितचा दबदबा दिसून येतो. एक नजर त्याच्या खास रेकॉर्डवर

WTC  मध्ये भारताकडून रोहित शर्मा नंबर वन

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार केल्यास, भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा हा सर्वात आघाडीवर आहे. भारताचा कॅप्टन आणि सलामीवीर बॅटर रोहित शर्मानं ३२ कसोटी सामन्यातील ५४ डावात ५०.०३ सरासरीनं २५५२ धावा केल्या आहेत. एकंदरीत विचार करता WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रुट आघाडीवर आहे. त्याने ५८ सामन्यातील १०६ डावात ४९७३ धावा केल्या आहेत. यात १६ शतकासह २० अर्धशतकांचा समावेश आहे.

सर्वाधिक षटकारासह सर्मावाधिक चौकारही रोहितच्या नावे 
 
 रोहित शर्मानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत ५२ षटकार मारले आहेत. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेन स्टोक्स ८१ षटकारांसह अव्वलस्थानी आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित त्याच्या कितपत जवळ जातोय, ते बघण्याजोगे असेल. भारताकडून सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहितचा पहिला नंबर लागतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने ५४ डावात ३०१ चौकार मारले आहेत. त्याच्यापाठोपाठ ६० डावातील २६० चौकारांसह विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. 

भारताकडून सर्वाधिक ९ शतक रोहितच्या नावे

रोहित शर्मानं २०१९ पासून सुरु झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक ९ शतके झळकावली आहेत. त्याच्याशिवाय मयंक अग्रवाल, शुबमन गिल आणि विराट कोहली यांच्या खात्यात प्रत्येकी ४-४ शतकांची नोंद आहे. रोहित शर्मानं  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील ५४ डावात ३०१ चौकार मारले आहेत. त्याच्यापाठोपाठ ६० डावातील २६० चौकारांसह विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. 
 

Web Title: IND vs BAN Test Why Rohit Sharma has been India's best batsman in World Test Championship since 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.