Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: केएल राहुलच्या तुफानी खेळीनंतर नेटकऱ्यांनी केला 'कोच कोहली'चा जयजयकार

सराव सत्रात कोहली राहुलला बॅटिंग टिप्स देताना दिसला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 03:04 PM2022-11-02T15:04:13+5:302022-11-02T15:04:59+5:30

whatsapp join usJoin us
IND vs BAN Virat Kohli earn praise from Team India Fans as KL Rahul returns to batting form against Bangladesh in T20 World Cup 2022 | Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: केएल राहुलच्या तुफानी खेळीनंतर नेटकऱ्यांनी केला 'कोच कोहली'चा जयजयकार

Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: केएल राहुलच्या तुफानी खेळीनंतर नेटकऱ्यांनी केला 'कोच कोहली'चा जयजयकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Virat Kohli KL Rahul, IND vs BAN: भारत आणि बांगलादेशचे संघ बुधवारी T20 विश्वचषकाच्या महत्त्वपूर्ण सामन्यात आमनेसामने आले. रोहित शर्माच्या संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असतानाच केएल राहुलला फॉर्म गवसला. बांगलादेशला हरवून भारतीय संघाला स्पर्धेत पुढे जाता येणार आहे हे माहिती असल्याने लोकेश राहुलने आपला रूद्रावतार या सामन्यात दाखवून दिला. एडिलेडच्या मैदानावर उतरलेल्या केएल राहुलने दणकेबाज खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३२ चेंडूत ५० धावांची खेळी केली. राहुलने अर्धशतकी खेळी केल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर विराट कोहलीचा जयजयकार केला. त्याचे कारणही खास होते.

बांगलादेश विरूद्ध मंगळवारी भारतीय संघ सराव सत्रात घाम गाळताना दिसला. या दरम्यान, सराव सत्रात विराट कोहली सलामीवीर केएल राहुलला फलंदाजीच्या काही टिप्स देताना दिसला. केएल राहुल खराब फॉर्मशी झुंजत होता. या स्पर्धेत त्याने ३ सामने खेळले आणि तिन्ही सामन्यांमध्ये त्याला दुहेरी आकडाही पार करता आला नाही. पाकिस्तानविरुद्ध ४ तर नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने ९-९ धावा केल्या. केएल राहुल भारताला दमदार सुरुवात करून देऊ शकला नाही, तर त्याचा संघालाही फटका बसताना दिसला. त्यामुळेच कोहली सराव सत्रात त्याला टिप्स देताना दिसला आणि त्याचा राहुलला फायदाच झाला.

--

--

--

दरम्यान, राहुलची ही अवस्था कोहलीपेक्षा चांगली कोणीही समजू शकत नाही. कोहली स्वतःही या टप्प्यातून गेला आहे आणि या परिस्थितीत मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे किती महत्त्वाचे आहे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. विराट कोहली स्वत: जवळपास ३ वर्षे खराब फॉर्मशी झुंज देत होता आणि नुकताच तो फॉर्ममध्ये परतला. आता वर्ल्डकपमध्ये त्याच्या बॅटने दमदार खेळी केली. कोहलीला एके काळी निवृत्तीपर्यंतचे सल्ले मिळू लागले होते, पण तो सतत मेहनत करत राहिला. त्याने उणिवांवर काम केले आणि गमावलेली लय परत मिळवली. त्याने एकट्याच्या जोरावर भारताला पाकिस्तानवर विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याच्या टिप्समुळे आज केएल राहुलही फॉर्ममध्ये परतला.

Web Title: IND vs BAN Virat Kohli earn praise from Team India Fans as KL Rahul returns to batting form against Bangladesh in T20 World Cup 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.