India vs Bangladesh Warm Up Match । न्यूयॉर्क : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ १ जून रोजी बांगलादेशविरूद्ध सराव सामना खेळेल. टीम इंडिया आयर्लंडविरूद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करेल. नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना होईल. न्यूयॉर्कमध्ये पावसाचे वातावरण असल्याने या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
दरम्यान, भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होईल. चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामना पाहता येईल. याशिवाय डिस्नी प्लस हॉटस्टारवर या सराव सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. भारत अ गटात असून, या गटात यजमान अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.
विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ -नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), तस्कीन अहमद, लिटन दास, सौम्य सरकार, तन्जीद हसन तमीम, शाकीब अल हसन, Tawhid Hridoy, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, तन्जीद हसन साकीब
राखीव खेळाडू - अफिफ हुसैन, हसन महमुद.
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा.
विश्वचषकासाठी चार गट - अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ