India vs Bangladesh Live Match Updates । न्यूयॉर्क : भारतीय संघ ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी सज्ज आहे. आज भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकाची तयारी होत आहे. २ जूनपासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकाला सुरुवात होत आहे. या आधी भारत आणि बांगलादेश यांच्यात सराव सामना होत आहे. सराव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली आजच्या सामन्यात नसणार आहे. विशेष बाब म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संजू सॅमसन डावाची सुरुवात करत आहेत. विराट नुकताच अमेरिकेत दाखल झाल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे.
नाणेफेकीवेळी रोहित शर्मा म्हणाला की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यामागे कोणतेही विशेष कारण नाही. प्रथमच न्यूयॉर्क येथे खेळत आहोत. त्यामुळे कोणताही विचार न करता प्रथम फलंदाजी करणे पसंत केले. येथील परिस्थिती आव्हानात्मक असून, आम्ही स्वत:ला हे आव्हान दिले आहे. विराट कालच इथे पोहोचला आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला.
सराव सामन्यासाठी दोन्हीही संघ -
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
बांगलादेश - नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, Tawhid Hridoy, लिटन दास, शाकीब अल हसन, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली, सौम्य सरकार, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शोरिफुल इस्लाम, रिशाद हुसैन, तन्जीद हसन साकीब.
Web Title: IND vs BAN Warm Up Match 2024 Live Streaming India vs Bangladesh Virat Kohli misses T20 World Cup warm-up match says Rohit sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.