भारत आणि बांदसादेश यांच्यातील ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबरला खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ हैदराबाद शहरात दाखल झाले आहे. सूर्या अँण्ड कंपनीचे हैदराबादकरांनी जंगी स्वागत केल्याचेही पाहायला मिळाले. अखेरचा सामना जिंकून टीम इंडिया पाहुण्यांना क्लीन स्वीप देण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे बांगलादेशचा संघ शेवट गोड करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
हैदराबादमध्ये टीम इंडियाचा बोलबाला, बांगलादेशसाठी असेल मोठ चॅलेंज
हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने आतापर्यंत एकूण २ टी20 सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. दुसरीकडे बांगलादेशसाठी हे ठिकाण नवे आहे. बांगलादेश पहिल्यांदाच या मैदानात टी-२० सामना खेळण्यासाठी उतरल्याचे पाहायला मिळेल. या मैदानात आतापर्यंत जे पाच आंतरराष्ट्रीय टी-२० सामने झाले आहेत त्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ३ विजय मिळवले आहेत. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाला इथं फक्त दोन वेळा विजय मिळाला आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा फॅक्टर ठरेल.
जलदगती गोलंदाजांपेक्षा फिरकीला मिळते मदत
हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवरील खेळपट्टीबद्दल बोलायचं तर इथं आतापर्यंत जे सामने झाले त्यात जलदगती गोलंदाजांना खेळपट्टीनं कधीही साथ दिलेी नाही. जलगती गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीसाठी इथं अधिक मदत असेल. त्यामुळेच इथं चौकार षटकारांची बरसात पाहायला मिळू शकते. अर्थात खेळपट्टीवर फलंदाजांकडून बल्लेबल्ले सीन पाहायला मिळू शकतो. आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात या मैदानात पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १४० इतकी आहे.
टीम इंडियात बदल होणार? शेवटच्या सामन्यात हर्षित राणाला मिळू शकते संधी
भारत आणि बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेत मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांनी पदार्पण केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी दमदार कामगिरीही करून दाखवली. आता अखेरच्या सामन्यात हर्षित राणाला संधी मिळणार का? ते देखील पाहण्याजोगे असेल. आयपीलच्या गत हंगामात या गोलंदाजानं १९ विकेट्स घेत लक्षवेधून घेतलं होते.