India vs England : चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video 

India vs England, 1st Test : इंग्लंडच्या गोलंदाजांनी टी इंडियाच्या तगड्या फलंदाजांना चेन्नई कसोटीत शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

By स्वदेश घाणेकर | Published: February 9, 2021 04:14 PM2021-02-09T16:14:01+5:302021-02-09T16:14:38+5:30

whatsapp join usJoin us
IND vs END : Ben Stokes cleans up Virat Kohli, Kevin Pietersen tweets in Hindi as England wins 1st Test, Video | India vs England : चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video 

India vs England : चेतावणी दिली होती; बेन स्टोक्सनं उडवला विराटचा त्रिफळा अन् 'ते' ट्विट व्हायरल, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 1st Test : इंग्लंडच्या गोलंदाजांनी टी इंडियाच्या तगड्या फलंदाजांना चेन्नई कसोटीत शरणागती पत्करण्यास भाग पाडले. इंग्लंडनं विजयासाठी ठेवलेल्या ४२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा दुसरा डाव १९२ धावांवर गडगडला. रोहित शर्मा, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे यांच्या पाठोपाठ कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्रिफळाचीत झाला. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स ( Ben Stokes) यानं विराटचा त्रिफळा उडवला अन् भारतीयांच्या आशा संपुष्टात आल्या. इंग्लंडनं हा सामना २२७ धावांनी जिंकला. भारतातील इंग्लंडचा हा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला. या विजयानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन ( Kevin Peterson) यानं ट्विट केलं आणि ते तुफान व्हायरल होत आहे. चेन्नईतील पराभवानंतर विराट कोहलीनं दिलं 'हे' कारण, म्हणाला...

पाचव्या दिवसाची पहिली विकेट ही चेतेश्वर पुजाराची ( १५) गेली. त्यानंतर जेम्स अँडरसननं एकाच षटकात गिल ( ५०) व रहाणे (०) यांचा त्रिफळा उडवला. रिषभ पंत (११) व वॉशिंग्टन सुंदर ( ०) हेही झटपट माघारी परतले. विराटनं १०४ चेंडूंत ७२ धावा केल्या, परंतु त्याची खेळी व्यर्थ ठरली. स्टोक्सनं विराटचा त्रिफळा उडवला.  ५ ओव्हर्स, ३ मेडन, ६ धावा अन् ३ विकेट्स; जेम्स अँडरसन जोमात, टीम इंडिया कोमात! 

पाहा व्हिडीओ...


या विजयानंतर पीटरसननं ट्विट केलं की, याद है मैने पेहेले ही चेतावनी दी थी के इतना जश्न ना मयाए ( मी आधीच चेतावणी दिली होती की ऑस्ट्रेलियातील विजयाचा एवढा आनंद साजरा करू नका)''

 

Web Title: IND vs END : Ben Stokes cleans up Virat Kohli, Kevin Pietersen tweets in Hindi as England wins 1st Test, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.