Join us  

IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियात दोन खेळाडूंचे पदार्पण, पहिली वन डे खेळण्यापूर्वी कृणाल पांड्या झाला Emotional!

IND vs ENG, 1st ODI : England win the toss, इंग्लंडने कसोटी आणि टी-२० मालिकेत विजयाने सुरुवात केली होती; पण या दोन्ही स्वरूपात त्यांना लय कायम राखण्यात अपयश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 1:12 PM

Open in App

India vs England, 1st ODI, Pune : कसोटी व ट्वेंटी -२० मालिकांमध्ये शानदार पुनरागमन करणारा भारतीय संघ विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यास प्रयत्नशील राहील. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियानं पहिल्या वन डे त कृणाल पांड्या व प्रसिद्ध कृष्णा यांना पदार्पणाची संधी दिली आहे. ( Prasidh Krishna & Krunal Pandya to debut for India). पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर कृणालनं ती आकाशाच्या दिशेनं उंचावली आणि वडिलांना श्रद्धांजली वाहिली. हार्दिक व कृणाल यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. वन डे त पदार्पण करताना कृणाल भावनिक झालेला पाहायला मिळाला.1st ODI live, 1st odi ind vs eng Live

इंग्लंडने कसोटी आणि टी-२० मालिकेत विजयाने सुरुवात केली होती; पण या दोन्ही स्वरूपात त्यांना लय कायम राखण्यात अपयश आले. धवनसाठी ही मालिका विशेष महत्त्वाची आहे. तो पहिल्या टी-२० सामन्यात अपयशी ठरला. भारताकडे आघाडीच्या फळीत अनेक पर्याय आहेत. शुभमन गिल संघात असून, पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल हेही आपला दावा सादर करीत आहेत. अशा स्थितीत धवनसाठी ही लढत अग्निपरीक्षा आहे. रोहित शर्माच्या साथीने धवन डावाची सुरुवात करण्याची पूर्ण अपेक्षा आहे.  प्रसिद्ध कृष्णा ठरणार इंग्लंड संघासाठी कर्दनकाळ?; जाणून घ्या त्याची कामगिरी 1st odi ind vs eng Live udates Score Mca Stadium

युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी दिली आहे, तर रिषभ पंतला वगळून लोकेश राहुल यष्टिंमागे दिसणार आहे.1st odi ind vs eng Live Score, 1st odi ind vs eng Live updates

India XI:  रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल ( यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या. शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा ( Rohit, Dhawan, Kohli (C), Rahul (WK), Iyer, Hardik Pandya, Krunal Pandya, Thakur, Bhuvneshwar, Kuldeep, Krishna)

England XI: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग, मोइन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल राशिद, मार्क वूड ( Roy, Bairstow, Morgan (C), Buttler (WK), Stokes, Billings, Ali, Sam Curran, Tom Curran, Rashid, Wood) 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रुणाल पांड्याविराट कोहली