IND vs ENG, 1st ODI : अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) पदार्पणाचा वन डे सामना गाजवला. अवघ्या २६ चेंडूंत ५० धावा पूर्ण करून पदार्पणात सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम त्यानं नावावर केला. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मलिकेत इशान किशन ( Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनीही पदार्पणात अर्धशतक झळकावले होते. त्यांच्या क्लबमध्ये आज कृणाल जाऊन सहभागी झाला. या सामन्यात कृणाल भावनिक झालेला पाहायला मिळाला. त्याला रडताना पाहून हार्दिकही डग आऊटमध्ये बसून रडत होता. 1st odi ind vs eng, ind vs eng Live, 1st odi ind vs eng
पाहा Unseen Photo
शिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानेही अर्धशतक झळकावले. विराट कोहली ६० चेंडूंत ५६ धावा करून माघारी परतला.धवन १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांवर बाद झाला. अखेरच्या दहा षटकांत कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ६१ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. 1st odi ind vs eng Live udates Score Mca Stadium
कृणाल ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर, तर लोकेश ४३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. यावेळी अखेरच्या षटकात कृणाल व टॉम यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. कृणालनं अखेरच्या षटकांत टॉमची भरपूर धुलाई केली. टॉमनं १० षटकांत एकही विकेट न घेता ६३ धावा दिल्या.