India vs England, 1st ODI : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या ( India all-rounder Krunal Pandya) यानं मंगळवारी टीम इंडियाच्या वन डे संघात पदार्पण केलं. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्याला मिळालेलं हे सर्वात मोठं गिफ्ट ठरलं. हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) हातून कृणालला वन डे टीमची कॅप देण्यात आली आणि कृणालने इमोशनल होत भावाला घट्ट मिठी मारली. जानेवारीत निधन झालेल्या वडिलांची आठवण काढत ती कॅप आकाशाच्या दिशेनं उंचावली आणि पदार्पणात जलद अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा कृणाल कॅमेरासमोर वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला. डगआऊटमध्ये बसलेला हार्दिकही भावाला पाहून इमोशनल झालेला पाहिला. सामन्यानंतर हार्दिकनं त्याच्या भावना व्यक्त करताना भावासाठी पोस्ट लिहिली. ( Hardik Pandya pens emotional note ahead of brother Krunal’s birthday ) कृणाल पांड्या ढसाढसा रडू लागला, त्या एका वाक्यानं सर्व भावना व्यक्त करून गेला, Video
कृणाल पांड्याचा आज ३० वा वाढदिवस आहे. मंगळवारी झालेल्या वन डे सामन्यात कृणालनं ३१ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली. त्यानं २६ चेंडूंत अर्धशतक झळकावून वन डे पदार्पणातील जलद अर्धशतकाचा विक्रम नावावर केला. कृणालनं लोकेश राहुलसह ५७ चेंडूंत नाबाद ११२ धावांची भागीदारी करताना संघाला ३१७ धावांपर्यंत मजल मारून दिली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव २५१ धावांवर गडगडला आणि टीम इंडियानं ६६ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. याच सामन्यातून पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णानं ( Prasidh Krishna) ४ विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्ड केला. पदार्पणात चार विकेट्स घेणारा तो भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला. भावाला रडताना पाहून हार्दिक पांड्याच्याही डोळ्यात आलं पाणी, Unseen Photo!
सामन्यानंतर हार्दिक पांड्यानं भावासाठी इमोशनल पोस्ट लिहिली. त्यानं लिहिलं की,''पप्पांना तुझा अभिमान वाटतोय. तुझ्या या खेळीनंतर त्यांना नक्कीच आनंद झाला असेल आणि वाढदिवसापूर्वी त्यांनीच तुला हे गिफ्ट दिलं आहे. तू याचा हकदार आहेस आणि तुझ्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण येत राहो. तुझ्या आनंदात माझा आनंद आहे.''