Join us  

IND vs ENG, 1st ODI : भारतीय संघाचे विजयी कमबॅक; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांचे संस्मरणीय पदार्पण

IND vs ENG, 1st ODI : कृणाल पांड्यानं पदार्पणात जलद अर्धशतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला, तर प्रसिद्ध कृष्णानं पदार्पणात सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 9:32 PM

Open in App
ठळक मुद्देशिखर धवननं १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावा केल्या कृणाल पांड्यानं पदार्पणात सर्वात जलद अर्धशतकाचा ( २६ चेंडू) वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलाप्रसिद्ध कृष्णानंही पदार्पणात ४ विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला

IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी इंग्लंडविरुद्धचा पहिला वन डे सामना गाजवला. टीम इंडियाच्या ५ बाद ३१७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी १३५ धावांची सलामी दिली. पण, त्यानंतर त्यांचा डाव गडगडला. सर्वप्रथम फलंदाजीत कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना फ्रंटसीटवर बसलेल्या पाहुण्यांना पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यानं बॅकफूटवर टाकले. शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यानं ट्वेंटी-20 मालिकेपाठोपाठ वन डेतही आपली धमक दाखवली आणि इंग्लंडची पळता भूई करून सोडली. इंग्लंडचा डाव २५१ धावांवर गुंडाळून भारतानं हा सामना ६६ धावांनी जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.  टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर ९८ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आाला. 

शिखर धवन (९८), रोहित शर्मा ( २८) आणि विराट कोहली ( ५६)  यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्रेयस अय्यर व हार्दिक पांड्या अपयशी ठरले, परंतु पदार्पणाचा सामना खेळणारा कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी  चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. कृणाल ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर, तर लोकेश ४३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला.  1st odi ind vs eng Live udates Score Mca Stadium

प्रत्युत्तरात जेसन रॉय ( Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यानं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. जेसन रॉयनं ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांची खेळी केली. बेन स्टोक्स ( १) १७व्या षटकात माघारी परतला. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( २२) याला जीवदान मिळालं, परंतु शार्दूलन त्याला मोठी खेळी करू दिली नाही. जॉनी बेअरस्टो ६६ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ९४ धावांवर शार्दूलच्या गोलंदाजीवर बाद झाला. जोस बटलरलाही ( २) शार्दूलनं माघारी जाण्यास भाग पाडले. बिनबाद १३५ धावांवरून इंग्लंडचा डाव गडगडला. त्यानंतर अनुभवी भुवनेश्वर कुमार व पदार्पणवीर कृणालनं इंग्लंडला धक्के दिले आणि भारतासाठी विजय खेचून आणला. प्रसिद्ध कृष्णानं ५४ धावांत ४ विकेट्स घेतल्या, शार्दूलनं तीन, तर भुवीनं दोन विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रुणाल पांड्याविराट कोहलीशिखर धवन