IND vs ENG, 1st ODI : टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी इंग्लंडविरुद्धचा पहिला वन डे गाजवल्याचे चित्र आतापर्यंत पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम फलंदाजीत कृणाल पांड्यानं ( Krunal Pandya) फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांच्या डोळ्यांत अश्रू आणले. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना फ्रंटसीटवर बसलेल्या पाहुण्यांना पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यानं बॅकफूटवर टाकले. त्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघातील गोलंदाज शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यान ट्वेंटी-20 मालिकेपाठोपाठ वन डेतही आपली धमक दाखवली आणि इंग्लंडची पळता भूई करून सोडली. 1st ODI live, 1st odi ind vs eng Live टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू जायबंदी; एकाला नेलं हॉस्पिटलमध्ये, तर एक मैदानाबाहेर
शिखर धवन (९८) आणि रोहित शर्मा ( 28) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. विराट कोहली ६० चेंडूंत ५६ धावा करून माघारी परतला. कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. कृणाल ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर, तर लोकेश ४३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला. भावाला रडताना पाहून हार्दिक पांड्याच्याही डोळ्यात आलं पाणी, Unseen Photo!
प्रत्युत्तरात जेसन रॉय ( Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यानं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. जेसन रॉयनं ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांची खेळी केली. बेन स्टोक्स ( १) १७व्या षटकात माघारी परतला. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( २२) याला जीवदान मिळालं, परंतु शार्दूलन त्याला मोठी खेळी करू दिली नाही. जॉनी बेअरस्टो ६६ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ९४ धावांवर शार्दूलच्या गोलंदाजीवर बाद झाला. जोस बटलरलाही ( २) शार्दूलनं माघारी जाण्यास भाग पाडले. बिनबाद १३५ धावांवरून इंग्लंडचा डाव ६ बाद २१७ असा गडगडला आहे. 1st odi ind vs eng, ind vs eng Live, 1st odi ind vs eng
Web Title: IND vs ENG, 1st ODI : Krunal Pandya first and now Prasidha Krishna making it a memorable day for debutants
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.