IND vs ENG, 1st ODI : ट्वेंटी-२० मालिकेत एक सामना खेळवून बाकावर बसवलेल्या शिखर धवननं ( Shikhar Dhawan) वन डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात दमदार खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत अर्धशतकी, तर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासोबत शतकी भागीदारी करताना धवननं संघाच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. पण, धवन १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांवर बाद झाला. नर्व्हस ९०मध्ये सर्वाधिक वेळा बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये सचिन तेंडुलकर ( १६) आघाडीवर आहे. त्यानंतर सौरव गांगुली ( ६), वीरेंद्र सेहवाग आणि शिखर धवन ( प्रत्येकी ५) यांचा क्रमांक येतो.
रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या. रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांचा सलामीवीर म्हणून सर्वाधिकवेळा ५०+ धावांचा विक्रम मोडला. रोहित व शिखर यांनी ३१ वेळा सलामीवीर म्हणून ५०+ धावांची भागीदारी केली. 1st odi ind vs eng Live udates Score Mca Stadium
रोहित माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. विराट कोहली व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. धवननं वन डेतील ३१वे अर्धशतक पूर्ण करताना दमदार खेळ केला. विराटनेही अर्धशतक पूर्ण केलं. त्याचे हे वन डेतील ६१ वे अर्धशतक ठरले. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर घरच्या मैदानावर १०००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यानं १९५ डावांत हा पल्ला पार करून सर्वात जलद विक्रमही नोंदवला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही ( ६) वूडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेन स्टोक्सनं टीम इंडियाला मोठे धक्के दिले. रोहित, धवन आणि हार्दिक पांड्या ( १) यांना त्यानं बाद केलं. 1st ODI live, 1st odi ind vs eng Live, 1st odi ind vs eng Live Score
पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कृणाल पांड्या आणि अपयशी ठरूनही कर्णधाकडून सातत्यानं संधी मिळवणाऱ्या लोकेश राहुलनं अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. या दोघांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कृणालनं अवघ्या २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या सामन्यातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता.