Join us  

Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI Live Updates : ५-२-९-४! जसप्रीत बुमराहने लावली वाट, ४५ वर्षांनंतर इंग्लंडवर ओढावली नामुष्की

India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 6:44 PM

Open in App

India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. बुमराहने पहिल्या ५ षटकांत  ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. त्याची दोन षटकं निर्धाव होती. मोहम्मद शमीने महत्त्वाची विकेट मिळवून देताना बेन स्टोक्सला बाद केले. यष्टिरक्षक रिषभ पंतने ( Rishabh Pant) दोन अफलातून झेल घेतले. २००५नंतर प्रथमच भारतीय गोलंदाजांनी वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या १० षटकांत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमक केला आहे. जसप्रती बुमराहने पॉवर प्लेमध्ये दम दाखवला. पहिल्या १० षटकांत चार विकेट्स घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी २०१३ मद्ये  भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेविरुद्ध  आणि २००३मध्ये जवागल श्रीनाथने श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. 

जसप्रीत बुमराहची पहिली पाच षटकं  

  • 1st over: 0,0,0,W, 0,W
  • 2nd over: 0,0,0,0,1,0
  • 3rd over: 0,0,W, 0,Wd+4,0,0
  • 4th over: 0,0,0,0,W,0
  • 5th over : 0, 1, 1w, 0,0,1,0

 

मोहम्मद शमीचे पहिले षटक सावध खेळून ६ धावा केल्यानंतर जेसन रॉय दुसऱ्या षटकात बुमराहच्या माऱ्याचा सामना करण्यासाठी उभा राहिला. पहिली तीन चेंडू चाचपडत खेळताना बाहेर जाणारा चौथा चेंडू छेडण्याचा मोह रॉय आवरू शकला नाही. बॅटची किनार घेत चेंडू स्टम्प्सवर आदळला अन् पाच चेंडूंत एकही धाव न करता रॉय माघारी परतला. त्यानंतर एक चेंडूच्या अंतराने बुमराहने जो रूटला बाद केले. अप्रतिम बाऊन्सर टाकून बुमराहने यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी रूटला भोपळ्यावर बाद केले. पुढील षटकात शमीने बेन स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था ३ बाद ७ अशी केली. त्यानंतर जॉनी बेअरस्टोला ( ७) झेलबाद करून बुमराहने चौथा धक्का दिला. त्यानंतर बुमराहने पाचवा धक्का देताना लिएम लिव्हिंगस्टोनचा त्रिफळा उडवला.   वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडचे चार फलंदाज एकाच डावात शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. १९७९ साली लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना भोपळा फोडू दिला नव्हता. त्याआधी ऑस्ट्रेलियाने १९७७मध्ये बर्मिंगहॅम येथे चौघांना शून्यावर बाद केले होते आणि त्यानंतर आज भारताने कमाल करून दाखवली. आजच्या सामन्यात जेसन रॉय ( ५ चेंडू),  जो रूट ( २ चेंडू), बेन स्टोक्स ( १ चेंडू), लिएम लिव्हिंगस्टोन ( ८ चेंडू) हे शून्यावर बाद झाले. इंग्लंडचा नि्मा संघ २६ धावांत माघारी परतला होता. मोईन अली व जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रसिद्ध कृष्णाने स्वतःच्याच गोलंदाजीवर भन्नाट रिटर्न कॅच पकडला. इंग्लंडला ५३ धावांवर ६वा धक्का बसला.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहमोहम्मद शामी
Open in App