Rohit Sharma, IND vs ENG 1st ODI Live Updates : रोहित शर्माच्या खणखणीत षटकाराने चिमुरडी जखमी झाली, इंग्लंडची वैद्यकीय टीम मदतीला धावली, Video 

India vs England 1st ODI Live Updates : रोहितने त्याचे फेव्हरिट पुल शॉट मारताना तीन खणखणीत षटकार खेचले. १५०वा वन डे सामना खेळणाऱ्या धवनसह हिटमॅनने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 09:11 PM2022-07-12T21:11:42+5:302022-07-12T21:13:33+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st ODI Live Updates : Little girl hit by Rohit Sharma's Six, england team send their physios to check on her in the stands, Video  | Rohit Sharma, IND vs ENG 1st ODI Live Updates : रोहित शर्माच्या खणखणीत षटकाराने चिमुरडी जखमी झाली, इंग्लंडची वैद्यकीय टीम मदतीला धावली, Video 

Rohit Sharma, IND vs ENG 1st ODI Live Updates : रोहित शर्माच्या खणखणीत षटकाराने चिमुरडी जखमी झाली, इंग्लंडची वैद्यकीय टीम मदतीला धावली, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर रोहित शर्माशिखर धवन ( Rohit Sharma & Shikhar Dhawan) या जोडीने इंग्लंडला झोडून काढले. रोहितने त्याचे फेव्हरिट पुल शॉट मारताना तीन खणखणीत षटकार खेचले. १५०वा वन डे सामना खेळणाऱ्या धवनसह हिटमॅनने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या दोघांनंतर वन डेत सलामीला ५०००+ धावा करणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली. रोहितच्या एका फटक्यावर प्रेक्षकांमध्ये उपस्थित चिमुरडी जखमी झाली. त्यावेळी इंग्लंडच्या वैद्यकीय टीमने चिमुरडीकडे धाव घेत तिच्यावर उपचार केले. 


जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. जसप्रीतने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ११० धावांत तंबूत पाठवला. भारताविरुद्ध आता ११० ही इंग्लंडची निचांक धावसंख्या आहे.  भारताविरुद्धही इंग्लंडची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. मोहम्मद शमीने तीन, तर प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. जेसन रॉय ( ५ चेंडू), जो रूट ( २ चेंडू), बेन स्टोक्स ( १ चेंडू), लिएम लिव्हिंगस्टोन ( ८ चेंडू) हे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून जोस बटलर ( ३०), डेव्हिड विली ( २१) यांनी चांगला खेळ केला. बुमराहने ६ विकेट्स घेताना इंग्लंडमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवचा ( ६-२५) विक्रम मोडला.

शिखर धवन व रोहित ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा वन डेत सलामीला खेळताना दिसली. या दोघांनी  मिळून ६ धावा करताना वन डेत सलामीवी म्हणून ५००० धावांचा पल्ला पार केला. असा पराक्रम करणारी ही चौथी जोडी ठरली.  धवनचा हा १५०वा सामना आहे. सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर यांनी ६६०९ धावा, अॅडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन यांनी ५३७२ धावा, गॉर्डन ग्रिनीज-डी हायनेस यांनी ५१५० धावा केल्या आहेत.  भारताने ११ षटकांत बिनबाद ५६ धावा केल्या आहेत.  डेव्हिड विलीने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोहितने फाईन लेगच्या दिशेने खणखणीत सिक्स मारला. पण, तो चेंडू प्रेक्षकांमध्ये उपस्थित मुलीला लागला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या वैद्यकीय टीमने धाव घेत उपचार केले.  

Web Title: IND vs ENG 1st ODI Live Updates : Little girl hit by Rohit Sharma's Six, england team send their physios to check on her in the stands, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.