Join us  

Rohit Sharma, IND vs ENG 1st ODI Live Updates : तेंडुलकर-गांगुलीनंतर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी मोठा विक्रम केला, जगात ठरली चौथी 'बेस्ट' जोडी

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर रोहित शर्मा व शिखर धवन ( Rohit Sharma & Shikhar Dhawan) या जोडीने इंग्लंडला झोडून काढले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 8:53 PM

Open in App

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर रोहित शर्माशिखर धवन ( Rohit Sharma & Shikhar Dhawan) या जोडीने इंग्लंडला झोडून काढले. रोहितने त्याचे फेव्हरिट पुल शॉट मारताना तीन खणखणीत षटकार खेचले. १५०वा वन डे सामना खेळणाऱ्या धवनसह हिटमॅनने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या दोघांनाच असा पराक्रम करता आला आहे आणि रोहित/धवनच्या आधी फक्त तीनच ओपनिंग जोडीला हा विक्रम करता आला होता. 

जसप्रीत बुमराहने इंग्रजांना लोळवले, मोठ मोठे विक्रम करत दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले

जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. जसप्रीतने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ११० धावांत तंबूत पाठवला. भारताविरुद्ध आता ११० ही इंग्लंडची निचांक धावसंख्या आहे.  भारताविरुद्धही इंग्लंडची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. मोहम्मद शमीने तीन, तर प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. २००५नंतर प्रथमच भारतीय गोलंदाजांनी वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या १० षटकांत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. जसप्रती बुमराहने पॉवर प्लेमध्ये दम दाखवला. पहिल्या १० षटकांत चार विकेट्स घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी २०१३ मद्ये  भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेविरुद्ध  आणि २००३मध्ये जवागल श्रीनाथने श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. 

वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडचे चार फलंदाज एकाच डावात शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. १९७९ साली लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना भोपळा फोडू दिला नव्हता. त्याआधी ऑस्ट्रेलियाने १९७७मध्ये बर्मिंगहॅम येथे चौघांना शून्यावर बाद केले होते आणि त्यानंतर आज भारताने कमाल करून दाखवली. आजच्या सामन्यात जेसन रॉय ( ५ चेंडू), जो रूट ( २ चेंडू), बेन स्टोक्स ( १ चेंडू), लिएम लिव्हिंगस्टोन ( ८ चेंडू) हे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून जोस बटलर ( ३०), डेव्हिड विली ( २१) यांनी चांगला खेळ केला.  शिखर धवन व रोहित ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा वन डेत सलामीला खेळताना दिसली. या दोघांनी  मिळून ६ धावा करताना वन डेत सलामीवी म्हणून ५००० धावांचा पल्ला पार केला. असा पराक्रम करणारी ही चौथी जोडी ठरली.  धवनचा हा १५०वा सामना आहे. सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर यांनी ६६०९ धावा, अॅडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन यांनी ५३७२ धावा, गॉर्डन ग्रिनीज-डी हायनेस यांनी ५१५० धावा केल्या आहेत.  भारताने ११ षटकांत बिनबाद ५६ धावा केल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माशिखर धवनसचिन तेंडुलकरसौरभ गांगुली
Open in App