Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI Live Updates : विश्वविजेत्या इंग्लंडची जसप्रीत बुमराहसमोर शरणागती; १९ धावांत ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाचा विक्रम

India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 07:39 PM2022-07-12T19:39:21+5:302022-07-12T19:40:17+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st ODI Live Updates : six wicket haul by Jasprit Bumrah - 6/19, England 110/10 in 25.2 overs against India     | Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI Live Updates : विश्वविजेत्या इंग्लंडची जसप्रीत बुमराहसमोर शरणागती; १९ धावांत ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाचा विक्रम

Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI Live Updates : विश्वविजेत्या इंग्लंडची जसप्रीत बुमराहसमोर शरणागती; १९ धावांत ६ विकेट्स घेत भारतीय गोलंदाजाचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. बुमराहने पहिल्या ५ षटकांत ९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. त्याची दोन षटकं निर्धाव होती. त्यानंतर मोहम्मद शमी व प्रसिद्ध कृष्णा यांनी धक्के दिले. २०१९चा वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडची अवस्था भारतीय गोलंदाजांनी अत्यंत वाईट केली. पहिल्या स्पेलमध्ये चार विकेट्स घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या स्पेलमध्ये कमाल केली. त्याने वन डे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एका सामन्यात पाच विकेट्स  घेण्याचा पराक्रम केला. 

मोहम्मद शमीचे पहिले षटक सावध खेळून ६ धावा केल्यानंतर जेसन रॉय दुसऱ्या षटकात बुमराहच्या माऱ्याचा सामना करण्यासाठी उभा राहिला. पहिली तीन चेंडू चाचपडत खेळताना बाहेर जाणारा चौथा चेंडू छेडण्याचा मोह रॉय आवरू शकला नाही. बॅटची किनार घेत चेंडू स्टम्प्सवर आदळला अन् पाच चेंडूंत एकही धाव न करता रॉय माघारी परतला. त्यानंतर एक चेंडूच्या अंतराने बुमराहने जो रूटला बाद केले.  पुढील षटकात शमीने बेन स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था ३ बाद ७ अशी केली. त्यानंतर जॉनी बेअरस्टोला ( ७) झेलबाद करून बुमराहने चौथा धक्का दिला. त्यानंतर बुमराहने पाचवा धक्का देताना लिएम लिव्हिंगस्टोनचा त्रिफळा उडवला. 

२००५नंतर प्रथमच भारतीय गोलंदाजांनी वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या १० षटकांत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमक केला आहे. जसप्रती बुमराहने पॉवर प्लेमध्ये दम दाखवला. पहिल्या १० षटकांत चार विकेट्स घेणारा तो भारताचा तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी २०१३ मद्ये  भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेविरुद्ध  आणि २००३मध्ये जवागल श्रीनाथने श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली होती. वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडचे चार फलंदाज एकाच डावात शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. १९७९ साली लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना भोपळा फोडू दिला नव्हता. त्याआधी ऑस्ट्रेलियाने १९७७मध्ये बर्मिंगहॅम येथे चौघांना शून्यावर बाद केले होते आणि त्यानंतर आज भारताने कमाल करून दाखवली. 


आजच्या सामन्यात जेसन रॉय ( ५ चेंडू), जो रूट ( २ चेंडू), बेन स्टोक्स ( १ चेंडू), लिएम लिव्हिंगस्टोन ( ८ चेंडू) हे शून्यावर बाद झाले. इंग्लंडचा नि्मा संघ २६ धावांत माघारी परतला होता. मोईन अली व जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रसिद्ध कृष्णाने स्वतःच्याच गोलंदाजीवर भन्नाट रिटर्न कॅच पकडला. इंग्लंडला ५३ धावांवर ६वा धक्का बसला. पाठोपाठ जोस बटलर झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. १५व्या षटकात शमीच्या गोलंदाजीवर डाव्या बाजूला चौकार खेचल्यानंतर बटलरने पुढील चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हवेत टोलवला. पण, सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर झेल टिपला. बटलर ३२ चेंडूंत ३० धावा करून माघारी परतला. शमीने पुढच्याच षटकात क्रेग ओव्हरटनचा ( ८) त्रिफळा उडवून वन डेतील १५० वी विकेट घेतली. भारताकडून सर्वात जलद १५० विकेट्स घेण्याचा विक्रम शमीने नावावर केला. त्याने ८० सामन्यांत हा पराक्रम केला अन् अजित आगरकरचा ( ९७ सामने) विक्रम मोडला. 

भारताने २००६मध्ये जयपूर वन डेत इंग्लंडला १२५ धावांत गुंडाळले होते आणि तो भारताविरुद्धचा त्यांचा निच्चांक स्कोअर होता. भारताने २०१४ मध्ये बांगलादेशला ५८, २००५मध्ये झिम्बाब्वेला ६५, २००३मध्ये बांगलादेशला ७६, २०१६मध्ये न्यूझीलंडला ७९, १९८५ मध्ये पाकिस्तानला ८७ आणि २००३मध्ये केनियाला ९० धावांत गुंडाळले होते. डेव्हिड विली व ब्रेडन कार्स यांची ३५ धावांची भागीदारी बुमराहने संपुष्टात आणली. त्याने कार्सचा ( १५) त्रिफळा उडवला. बुमराहने विलीलाही ( २१) माघारी पाठवून इंग्लंडचा डाव ११० धावांत गुंडाळला. शमीने तीन विकेट्स घेतल्या. बुमराहने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम नावावर केला.  यापूर्वी कुलदीप यादवने २०१८मध्ये २५ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या.  

Web Title: IND vs ENG 1st ODI Live Updates : six wicket haul by Jasprit Bumrah - 6/19, England 110/10 in 25.2 overs against India    

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.