Virat Kohli, IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली संघासोबत मैदानावर हजर होता, तरीही रोहितने त्याच्या नावाचा विचार नाही केला; BCCI ने सांगितलं कारण 

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:33 PM2022-07-12T17:33:02+5:302022-07-12T17:34:05+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st ODI Live Updates : Virat Kohli has a mild groin strain while Arshdeep Singh has right abdominal strain, and so were not considered, Say Rohit Sharma | Virat Kohli, IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली संघासोबत मैदानावर हजर होता, तरीही रोहितने त्याच्या नावाचा विचार नाही केला; BCCI ने सांगितलं कारण 

Virat Kohli, IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली संघासोबत मैदानावर हजर होता, तरीही रोहितने त्याच्या नावाचा विचार नाही केला; BCCI ने सांगितलं कारण 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेत यजमानांना हरवण्यासाठी सज्ज आहे. तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विराटला दुखापत झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे विराट कोहली ( Virat Kohli) पहिल्या वन डेत खेळतो की नाही याबाबत सस्पेन्स होतं. पण, विराट संघासोबत ओव्हल मैदानावर दाखल झाला आणि चाहत्यांना आनंद झालेला पाहायला मिळालं. पण, नाणेफेक झाल्यानंतर त्यांचा आनंद हिरावला गेला. रोहितने विराटच्या नावाच विचारच केला नसल्याचे स्पष्ट सांगून टाकले आणि तो आज खेळण्यास नसल्याचे समोर आले. त्यानंतर BCCI ने अपडेट्स दिले.  

भारत-इंग्लंड यांच्यातील वन डे सामन्यांतील जय-पराजयाची आकडेवारी ही ५५-४३ अशी टीम इंडियाच्या बाजूने आहे.  शिखर धवन व रोहित ही जोडी पुन्हा एकदा वन डेत सलामीला खेळताना दिसणार आहे.  या दोघांनी आज मिळून ६ धावा केल्यास वन डे क्रिकेटमध्ये ५०००+ धावा करणारी ही पाचवी ओपनर्सची जोडी ठरले. धवनचा हा १५०वा सामना आहे. रोहितला वन डे क्रिकेटमध्ये २५० षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी आज ५ उत्तुंग फटके मारावे लागतील. रोहितने इंग्लंडमध्ये २४ डावांमध्ये ६६.७५च्या सरासरीने १३३५ धावा केल्या आहेत आणि त्यात ७ शतकांचा समावेश आहे.  ओव्हल येथे झालेल्या मागील १० वन डे सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना २९१ ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले. रोहित व शिखर सलामीला येतील, त्यानंतर श्रेयस, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल व प्रसिद्ध कृष्णा असा संघ आहे. ''इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी विराट कोहली आणि अर्शदीप सिंग यांचा विचार करण्यात आला नाही. विराटच्या मांडीवर सौम्य ताण आहे तर अर्शदीपच्या उजव्या पोटात ताण आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे,''असे बीसीसीआयने सांगितले.  

 

Web Title: IND vs ENG 1st ODI Live Updates : Virat Kohli has a mild groin strain while Arshdeep Singh has right abdominal strain, and so were not considered, Say Rohit Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.