IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली खेळणार नाही; टीम इंडिया ५ फलंदाज, २ अष्टपैलू, ४ गोलंदाज घेऊन उतरली मैदानावर

India vs England 1st ODI Live Updates : ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेत इंग्लंडला पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:08 PM2022-07-12T17:08:38+5:302022-07-12T17:11:30+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st ODI Live Updates : Virat Kohli not available for first ODI at Oval,  India won the toss and chose to bowl first, know playing Xi | IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली खेळणार नाही; टीम इंडिया ५ फलंदाज, २ अष्टपैलू, ४ गोलंदाज घेऊन उतरली मैदानावर

IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली खेळणार नाही; टीम इंडिया ५ फलंदाज, २ अष्टपैलू, ४ गोलंदाज घेऊन उतरली मैदानावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st ODI Live Updates : ट्वेन्टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेत इंग्लंडला पराभूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. पण, आज खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी भारताला धक्का बसला आहे. मधल्या फळीतील स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकला आहे. विराट टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंसोबत ओव्हल येथे दाखल झाला खरा, परंतु त्याला विश्रांती दिली गेली आहे. फिजिओने पुन्हा एकदा विराटच्या तंदुरुस्तीची चाचपणी केली, परंतु तो खेळण्यास तंदुरुस्त नाही. भारतीय संघ ५ फलंदाज, २ अष्टपैलू, ४ गोलंदाज घेऊन मैदानावर उतरणार असल्याचे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले. 


भारताला SENA देशांतील मागील काही वन डे मालिकांमध्ये विजय मिळवता आलेला नाही. २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्ध २-१ असा पराभव, २०२०मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३-०, २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-१ आणि २०२२मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-० अशी हार भारताला पत्करावी लागली आहे.  त्यामुळे ही पराभवाची मालिका तोडण्याची संधी रोहित शर्मा अँड टीमला आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील वन डे सामन्यांतील जय-पराजयाची आकडेवारी ही ५५-४३ अशी टीम इंडियाच्या बाजूने आहे.  

शिखर धवन व रोहित ही जोडी पुन्हा एकदा वन डेत सलामीला खेळताना दिसणार आहे.  या दोघांनी आज मिळून ६ धावा केल्यास वन डे क्रिकेटमध्ये ५०००+ धावा करणारी ही पाचवी ओपनर्सची जोडी ठरले. धवनचा हा १५०वा सामना आहे. रोहितला वन डे क्रिकेटमध्ये २५० षटकारांचा टप्पा गाठण्यासाठी आज ५ उत्तुंग फटके मारावे लागतील. रोहितने इंग्लंडमध्ये २४ डावांमध्ये ६६.७५च्या सरासरीने १३३५ धावा केल्या आहेत आणि त्यात ७ शतकांचा समावेश आहे.  ओव्हल येथे झालेल्या मागील १० वन डे सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना २९१ ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. 

विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले. रोहित व शिखर सलामीला येतील, त्यानंतर श्रेयस, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल व प्रसिद्ध कृष्णा असा संघ आहे. 

Web Title: IND vs ENG 1st ODI Live Updates : Virat Kohli not available for first ODI at Oval,  India won the toss and chose to bowl first, know playing Xi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.