IND vs ENG, 1st ODI : भारतीय फलंदाजांच्या दमदार कामगिरीला इंग्लंडच्या सलामीवीरांकडून सडेतोड उत्तर मिळालं. जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णानं ( Prasidh Krishna) पहिल्या स्पेलमध्ये ३ षटकांत ३७ धावा दिल्या होत्या. पण, कॅप्टन विराट कोहलीनं त्याला पुन्हा गोलंदाजीला आणले आणि त्यानंतर त्यानं सलग दोन षटकांत दोन विकेट्स घेत कमाल केली. त्यानं जेसन रॉय आणि बेन स्टोक्स यांना माघारी पाठवून संघाला मोठे यश मिळवून दिले. १७व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला आणखी एक विकेट मिळाली असती, परंतु स्लीमध्ये विराटकडून झेल सुटला.1st odi ind vs eng Live udates Score Mca Stadium
त्यानंतर काय घडलं?
तोपर्यंत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गननं क्रिज सोडलं होतं. विराटनं झेल पकडला असाच सर्वांचा सुरुवातीला समज झाला होता. पण, विराटला तो चेंडू खाली पडला हे समजलं आणि त्यानं स्टम्पच्या दिशेनं चेंडू फेकला. मॉर्गन क्रिजच्या बराच बाहेर होता. स्टम्पजवळ एखादा खेळाडू असता तर तो मॉर्गनला सहज बाद करू शकला असता. पण, तिथे कुणीच नव्हतं आणि मॉर्गनला एकाच चेंडूवर दोन जीवदान मिळाले. भावाला रडताना पाहून हार्दिक पांड्याच्याही डोळ्यात आलं पाणी, Unseen Photo! 1st ODI live, 1st odi ind vs eng Live
भारतीय फलंदाजांची फटकेबाजीशिखर धवन ( Shikhar Dhawan) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या. कर्णधार
विराट कोहली ( Virat Kohli) यानेही अर्धशतक झळकावले. विराट कोहली ६० चेंडूंत ५६ धावा करून माघारी परतला.धवन १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांवर बाद झाला. अखेरच्या दहा षटकांत कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ६१ चेंडूंत ११२ धावांची भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. कृणाल ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर, तर लोकेश ४३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर नाबाद राहिला.
कृणाल पांड्या ढसाढसा रडू लागला, त्या एका वाक्यानं सर्व भावना व्यक्त करून गेला, Video 1st odi ind vs eng Live Score, 1st odi ind vs eng Live updates
इंग्लंडची दमदार सुरुवात
प्रत्युत्तरात इंग्लंडच्या सलामीवीरांनी सडेतोड उत्तर दिले. जेसन रॉय ( Jason Roy) आणि जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. पदार्पणवीर प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna) यानं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानं जेसन रॉयला सूर्यकुमार यादवच्या हातून झेलबाद करून माघारी पाठवले. जेसन रॉयनं ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४६ धावांची खेळी केली. बेन स्टोक्स ( १) १७व्या षटकात माघारी परतला. 1st odi ind vs eng, ind vs eng Live, 1st odi ind vs eng विराट कोहलीचा फॉर्म 'त्या' लकी गोष्टीमुळे परतला?, पहिल्या वन डेत सिक्रेट ओपन
Web Title: IND vs ENG, 1st ODI : Prasidh Krishna Game changing spell, Virat Kohli drops Eoin Morgan first ball and then Morgan gets away with being run out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.