IND vs ENG 1st ODI : भारतीय संघाच्या पहिल्या वन डे सामन्यातील विजयात जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जसप्रीतने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडला हादरवून टाकले. त्यानंतर १११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावांची खेळी केली. शिखर धवनने नाबाद ३१ धावा केल्या. ओपनर म्हणून जोडीने ५०००+ धावा करणारी रोहित-धवन ही भारताची दुसरी सलामीची जोडी ठरली. या सामन्यात रोहितने षटकारांचाही विक्रम केला. भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये २५० षटकार मारणारा तो पहिला फलंदाज बनला. पण, या दोन विक्रमांशिवाय रोहितने आणखी दोन मोठे विक्रम नावावर केले आणि त्यापैकी एकात तर त्याने गुरू राहुल द्रविडचा विक्रम मोडला.
कॅप्टन असावा तर असा! मॅच संपताच ६ वर्षीय मीरा साळवीची रोहित शर्माने घेतली भेट, पण का?
याशिवाय इंग्लंडमध्ये परदेशी फलंदाजांमध्ये सर्वाधिक वन डे धावा करण्याचा विक्रम रोहितने नावावर केला. त्याच्या नावावर १४११ धावा झाल्या आहेत. केन विलियम्सन १३९३ धावांसह या विक्रमात आघाडीवर होता, पण रोहितने त्याला मागे टाकले. १३८७ धावांसह रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय इंग्लंडमध्ये सर्वाधिक 50+ धावांचा विक्रमही रोहितने नावावर केला. त्याने १४ वेळा 50+ धावांची खेळी करून राहुल द्रविड (१३), विराट कोहली ( १३) व केन विलियम्सन ( १३) यांना मागे टाकले.