IND vs ENG, 1st ODI : रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिल्यानंतर कर्णधार विराट कोहलीही फॉर्मात दिसला. शिखर धवननं ३१वे अर्धशतक झळकवताना फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. दुसरीकडे विराटनंही अर्धशतक झळकावले. त्यानं ६० चेंडूंत ६ चौकारांसह ५६ धावा केल्या. त्यानं दुसऱ्या विकेटसाठी धवनसह १०२ चेंडूंत १०५ धावांची भागीदारी केली. ३३व्या षटकात मार्क वूडनं त्याला बाद केलं. पण, धवननं फटकेबाजी करताना वन डे तील १८व्या शतकानजीक पोहोचला, परंतु त्याला बेन स्टोक्सनं ( Ben Stokes) माघारी जाण्यास भाग पाडले. धवन १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांवर बाद झाला. ist ODI live, 1st odi ind vs eng Live विराट कोहलीचा मोठा विक्रम, सचिन तेंडुलकरनंतर 'हा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय
रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या. रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीनं सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांचा सलामीवीर म्हणून सर्वाधिकवेळा ५०+ धावांचा विक्रम मोडला. रोहित व शिखर यांनी ३१ वेळा सलामीवीर म्हणून ५०+ धावांची भागीदारी केली. 1st odi ind vs eng Live Score विराट कोहलीचा फॉर्म 'त्या' लकी गोष्टीमुळे परतला?, पहिल्या वन डेत सिक्रेट ओपन
रोहित माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. विराट कोहली व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. धवननं वन डेतील ३१वे अर्धशतक पूर्ण करताना दमदार खेळ केला. विराटनेही अर्धशतक पूर्ण केलं. त्याचे हे वन डेतील ६१ वे अर्धशतक ठरले. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनंतर घरच्या मैदानावर १०००० आंतरराष्ट्रीय धावा करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यानं १९५ डावांत हा पल्ला पार करून सर्वात जलद विक्रमही नोंदवला. त्यानंतर आलेला श्रेयस अय्यरही ( ६) वूडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. 1st odi ind vs eng, ind vs eng Live, 1st odi ind vs eng
Web Title: IND vs ENG, 1st ODI : Shikhar Dhawan dismissed for 98, missed out a deserving hundred for just two runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.