Join us  

IND vs ENG, 1st ODI : शिखर धवनचं शतक हुकलं, पण कृणाल पांड्या- लोकेश राहुल यांनी इंग्रजांना धु धु धुतलं

IND vs ENG, 1st ODI: रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 5:47 PM

Open in App

IND vs ENG, 1st ODI : ट्वेंटी-२० मालिकेत एक सामना खेळवून बाकावर बसवलेल्या शिखर धवननं ( Shikhar Dhawan) वन डे मालिकेतील पहिल्याच सामन्यात दमदार खेळी केली. सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) सोबत अर्धशतकी, तर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्यासोबत शतकी भागीदारी करताना धवननं संघाच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. पण,  धवन १०६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ९८ धावांवर बाद झाला. अखेरच्या दहा षटकांत कृणाल पांड्या ( Krunal Pandya) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी फटकेबाजी करताना वैयक्तिक अर्धशतकासह ५२ चेंडूंत शतकी भागीदारी केली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३१७ धावा केल्या. 1st odi ind vs eng Live Score

रोहित शर्मा व शिखर धवन यांनी टीम इंडियाला सावध सुरुवात करून दिली. रोहित शर्माच्या कोपऱ्याला चेंडू लागल्यानं त्याला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. पण, तरीही त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन स्टोक्सनं ही ६४ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. रोहित ४२ चेंडूंत ४ चौकरांसह २८ धावा केल्या. रोहित माघारी परतल्यानंतर विराट कोहली आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. विराट कोहली व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.  श्रेयस अय्यरही ( ६) वूडच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बेन स्टोक्सनं टीम इंडियाला मोठे धक्के दिले. रोहित, धवन आणि हार्दिक पांड्या ( १) यांना त्यानं बाद केलं. 1st odi ind vs eng Live udates Score Mca Stadium

पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या कृणाल पांड्या आणि अपयशी ठरूनही कर्णधाकडून सातत्यानं संधी मिळवणाऱ्या लोकेश राहुलनं अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. या दोघांनी ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कृणालनं अवघ्या २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. पदार्पणाच्या सामन्यातील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीत ६ चौकार व २ षटकारांचा समावेश होता. कृणालपाठोपाठ लोकेशनेही अर्धशतक पूर्ण केले. कृणाल ३१ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांवर, तर लोकेश ४३ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६2 धावांवर नाबाद राहिला.  1st ODI live, 1st odi ind vs eng Live

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशिखर धवनक्रुणाल पांड्यालोकेश राहुलविराट कोहली