India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) इंग्लंड कंडीशनचा पुरेपूर फायदा उचलताना यजमानांना धक्क्यांवर धक्के दिले. त्याने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ११० धावांत तंबूत पाठवला. त्यानंतर रोहित शर्मा व शिखर धवन यांनी ११४ धावांची भागीदारी करताना भारताला पहिल्या वन डेत विजय मिळवून दिला. भारताने या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दरम्यान ही मॅच संपल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा ६ वर्षीय मीरा साळवी ( Meera Salvi) हिला भेटायला गेला अन् तिला त्याने चॉकलेटही दिली.
जसप्रीतने सहा विकेट्स घेताना इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजाकडून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. यापूर्वी कुलदीप यादवने २५ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. मोहम्मद शमीने तीन विकेट्स व प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने इंग्लंडला झोडून काढले. रोहितने वन डेतील ४५ वे अर्धशतक पूर्ण करताना चांगली फटकेबाजी केली. शिखरने त्याला उत्तम साथ दिली. रोहित-धवन या जोडीने १८.४ षटकांत हा सामना संपवला. रोहितने ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७६ धावा केल्या, तर धवनने ३१ धावा करताना भारताला १० विकेट्स व १८८ चेंडू राखून विजय मिळवून दिला.
दरम्यान, डेव्हिड विलीने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोहितने फाईन लेगच्या दिशेने खणखणीत सिक्स मारला. पण, तो चेंडू प्रेक्षकांमध्ये उपस्थित मुलीला लागला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या वैद्यकीय टीमने धाव घेत उपचार केले. तिला दुसऱ्या वन डेची मॅच तिकिटही त्यांनी दिली. सामना संपल्यानंतर रोहित ज्या मुलीला भेटला ती हिच... रोहितने मीराची विचारपूस केली व तिला चॉकलेट दिले.
Web Title: IND vs ENG 1st ODI : who is Meera Salvi? Rohit Sharma met the 6 years old girl and gave chocolate to her after the match, This girl was injured by Rohit's six, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.