IND vs ENG 1st One Day : पहिल्या वनडेत भारताचा आठ विकेट्सने विजय

इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने सहा विकेट्स घेत वर्चस्व गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:42 PM2018-07-12T16:42:05+5:302018-07-13T05:17:55+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st One Day LIVE: India won the toss and elected to bowl | IND vs ENG 1st One Day : पहिल्या वनडेत भारताचा आठ विकेट्सने विजय

IND vs ENG 1st One Day : पहिल्या वनडेत भारताचा आठ विकेट्सने विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देरोहितने 114 चेंडूंत 15 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 137 धावांची दमदार खेळी साकारली.

नॉटींगहॅम : ‘चायनामन’ कुलदीप यादवच्या (६/२५) भेदक फिरकीनंतर ‘हीटमॅन’ रोहित शर्माने (१३७*) झळकावलेले तडाखेबंद नाबाद शतक या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवताना इंग्लंडचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव २६८ धावांत संपुष्टात आणला. यानंतर भारताने ४०.१ षटकातंच केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात २६९ धावा काढल्या.
टेÑंट ब्रीज स्टेडियमवर धावांचा पाठलाग करताना रोहित - शिखर धवन यांनी अर्धशतकी सलामी देत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. टी२० मालिकेत लौकिकास साजेशी कामगिरी करु न शकलेला धवन चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, मोइन अलीला षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने २७ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहलीने रोहितसह भारताला मजबूत स्थितीत आणले.
रोहित - कोहली यांनी दुसºया गड्यासाठी १६७ धावांची निर्णायक भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. कोहलीने ८२ चेंडूत ७ चौकारांसह ७५ धावा केल्या. रोहितने टी२० मालिकेतील फॉर्म कायम ठेवत इंग्लंडवर वर्चस्व राखले. संथ सुरुवात करत रोहितने जम बसवला. त्यानंतर त्याला रोखणे इंग्लंडला शक्य झाले नाही. रोहितने ११४ चेंडूत १५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १३७ धावा फटकावल्या.
तत्पूर्वी, आक्रमक सुरुवात केलेल्या इंग्लंडची कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे घसरगुंडी उडाली. कुलदीपने केवळ २५ धावांत ६ बळी घेत इंग्लंडला रोखण्यात मोलाचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)

कुलदीपची भेदक गोलंदाजी; दमदार सुरुवातीनंतर इंग्लंडला धक्का
कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजीची दाणदाण उडाली. त्याने जेसन रॉय, जॉनी बेयरस्टॉ व जो रुट या आघाडीच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद केल्याने इंग्लंडचा डाव ४ बाद १०५ असा घसरला.

बेन स्टोक्स, जोस बटलर यांनी ९३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले. मात्र, कुलदीपने बटलरला बाद केले. त्याने ५१ चेंडूत ५ चौकारांसह ५३ धावा केल्या. यानंतर लगेच स्टोक्स व डेव्हिड विली (१) कुलदीपचे बळी ठरले. स्टोक्सने १०३ चेंडूत २ चौकारांसह ५० धावा केल्या.

कुलदीपने ६ बळी घेत इंग्लंडची भक्कम फलंदाजी उध्वस्त केली. उमेश यादवनेही २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. कुलदीपने पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५ किंवा त्याहून अधिक बळी घेतले. इंग्लंडमध्ये ६ बळी घेणारा तो पहिला फिरकीपटू तसेच एकदिवसीय सामन्यात६ बळी घेणारा तो आठवा भारतीयही ठरला.

 

 

पहिल्या वनडेत भारताचा आठ विकेट्सने विजय

कुलदीप यादवचे सहा बळी आणि रोहित शर्माच्या नेत्रदीपक शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या वनडेमध्ये इंग्लंडवर आठ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. इंग्लंडने भारतापुढे 269 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले ते रोहितच्या दिमाखदार शतकामुळे. रोहितने 114 चेंडूंत 15 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद 137 धावांची दमदार खेळी साकारली. रोहितने सलग दुसरे शतक झळकावले आणि संघालाही सलग दुसरा विजय मिळवून दिला.

 

- विराट कोहली OUT; भारताला दुसरा धक्का



 

- षटकारासह रोहित शर्माचे शतक पूर्ण

- चौकारासह रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण



 

- पंधराव्या षटकात भारताचे शतक पूर्ण

मोईन अलीच्या गोलंदाजीवर भारताचा सलामीवीर शिखर धवन बाद



 

- रोहितच्या षटकारासह भारताच्या पन्नास धावा पूर्ण

- भारत 5 षटकांत बिनबाद 37

- शिखर धवनचे सलग दोन चौकार

नॉटींगहॅम -  इंग्लंडविरूद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने सहा विकेट्स घेत वर्चस्व गाजवले. कुलदीपने दिलेल्या धक्क्यांमुळे यजमान इंग्लंडला दमदार सुरूवातीनंतरही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी पडझडीनंतर सावध खेळ करताना इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मोठे फटके मारण्याचा मोह कटाक्षाने टाळला. या जोडीने इंग्लंडला दोनशेचा पल्ला गाठून दिला. पुन्हा एकदा कुलदीपने बळी टिपून ही जोडी फोडली. बटलर आणि स्टोक्स यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. मात्र या दोघांनाही कुलदीपने माघारी धाडले. कुलदीपने 10 षटकांत 25 धावा देताना 6 विकेट घेतल्या. त्याची ही वन डेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. इंग्लंडने निर्धारित 50 षटकांत 268 धावा केल्या. 

- आदिल रशिद बाद, उमेश यादवला दुसरा बळी



 

- उमेश यादवला पहिले यश, मोईन अली बाद

- वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सहा विकेट घेणारा कुलदीप पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे



 

- कुलदीपने 10 षटकांत 25 धावा देताना 6 विकेट घेतल्या. त्याची ही वन डेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.



 

- कुलदीपचा सहावा बळी, डेव्हिड विली बाद



 

- स्टोक्स ठरला कुलदीपचा पाचवा बळी



 

 - स्टोक्सचेही अर्धशतक, 102 चेंडूंत 50 धावा

- इंग्लंडच्या 40 षटकांत 5 बाद 202 धावा

- बटलर बाद, कुलदीपला चौथे यश



 

- बटलरचे अर्धशतक, स्टोक्ससोबत इंग्लंडच्या डावाला आकार

-  इंग्लंडच्या 30 षटकांत 4 बाद 158 धावा

- 25 षटकांत 4 बाद 134 धावा, बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांचा सावध पवित्रा

- 20 षटकांत 4 बाद 107 धावा

- ईयॉन मॉर्गनचा अडथळा दूर, इंग्लंड अडचणीत 



 

-  तीन धक्क्यांनंतर इंग्लंड बॅकफुटवर 0-73 वरून 3-83 धावा अशी बिकट अवस्था



 

- जॉनी बेअरस्टो 38 धावांवर माघारी, इंग्लंड 3 बाद 83 धावा

- कुलदीपचा आणखी एक बळी


- जो रुटही माघारी, कुलदीपला दुसरे यश, इंग्लंड 2 बाद 82 धावा


- रॉय आऊट, कुलदीप यादवला पहिल्याच षटकात यश


- इंग्लंडच्या 7 च्या सरासरीने दहा षटकांत 71 धावा 

- चहलच्या पहिल्याच षटकात 7 धावा

- आठव्या षटकानंतर फिरकीपटू युझवेंद्र चहलला पाचारण

- इंग्लंडच्या पाच षटकांत बिनबाद 26 धावा


- यादवकडून जेसन रॉयला जीवदान

- उमेश यादव व सिद्धार्थ कौल यांचा प्रभावी मारा

असे आहेत दोन्ही संघ



नाणेफेक जिंकून भारताची प्रथम गोलंदाजी

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत साहेबांना धूळ चारल्यानंतर आजपासून विराटसेना इंग्लंडविरोधात नव्या आव्हानाला सामोर जाणार आहे.  भारत आणि इंग्लंडविरोधात तीन सामन्याच्या वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे.  भारताने पहिल्या वन डे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. 


Web Title: IND vs ENG 1st One Day LIVE: India won the toss and elected to bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.