Join us  

Ind vs Eng 1st T20, Shreyas Iyer : रोहित शर्माला विश्रांती दिली, शेवटी मुंबईकरानेच लाज वाचवली!

Ind vs Eng 1st T20 Live : half century for Shreyas Iyer, श्रेयस अय्यर व हार्दिक पांड्या या जोडीनं दाणपट्टा चालवला आणि संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 8:45 PM

Open in App
ठळक मुद्देटीम इंडियाचे ३ फलंदाज २० धावांवर माघारी परतले असताना श्रेयस अय्यर मैदानावर आला श्रेयस ४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६७ धावांवर माघारी परतला

Ind Vs Eng T20 Live Update Score : रोहित शर्माला ( Rohit Sharma) विश्रांती देऊन पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात ( Ind Vs Eng 1st T20 Live Match) लोकेश राहुल ( KL Rahul) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) ही नवी जोडी सलामीला उतरवण्याचा निर्णय फसला. राहुल ( १), कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) भोपळा आणि शिखऱ धवन ( ४) हे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानं टीम इंडिया अडचणीत आली होती. पण, रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करून गाडी रुळावर आणली. त्यानंतर श्रेयस अय्यर व हार्दिक पांड्या या जोडीनं दाणपट्टा चालवला आणि संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. 

फिरीकपटू आदील राशीदला पहिलं षटक देऊन इंग्लंडनं त्यांची रणनीती स्पष्ट केली होती. त्यात जोफ्रा आर्चरनं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) माघारी पाठवले. आर्चरच्या त्या षटकात कर्णधार विराट कोहलीलाही ( Virat Kohli) अवघड गेलं. त्यात तिसऱ्या षटकात राशीदच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सोपा झेल देऊन माघारी परतला. भारताचे दोन फलंदाज ३ धावांवर बाद झाले. रिषभनं सुरुवातीपासून इंग्लंडच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण करत फटकेबाजी केली. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) १४१ kmph च्या वेगानं टाकलेला चेंडू रिषभनं 'खतरनाक' फटका मारून रिव्हर्स फटक्यानं यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमापार पाठवला. हा फटका पाहून जोफ्रासह इंग्लंडच्या अन्य खेळाडूंनी तोंडात बोटं टाकली. Ind Vs Eng 1st T20 Live Update Score

पण, तोही फार काळ खेळपट्टीवर जम बसवू शकला नाही. रिषभ २३ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून २१ धावांवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्या ५ षटकांत ३ बाद २० अशी दयनीय अवस्था असताना अय्यर खेळपट्टीवर आला आणि त्यानं सावध खेळ करताना डाव सावरला. त्यानं ३६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं.  भारताकडून चौथ्या क्रमांकावर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमात युवराज सिंग ( ८) आघाडीवर आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, रोहित शर्मा व मनीष पांडे ( प्रत्येकी ३ ) यांचा क्रमांक येतो. Ind vs Eng 1st T20 Live Match Today

हार्दिक २१ चेंडूंत १९ धावा ( १ चौकार व १ षटकार) करून माघारी परतला. शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) पहिल्याच चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) ४ षटकांत १ निर्धाव षटक टाकून २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  Ind vs Eng Live Score Today टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४  धावांचा समाधानकारक पल्ला गाठता आला. भारतानं १५ षटकांत ४ बाद ८३ धावा केल्या होत्या आणि अखेरच्या पाच षटकांत त्यांना ४१ धावा जोडता आल्या. श्रेयस ४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६७ धावांवर माघारी परतला. Ind Vs Eng 1st T20 Match Today, Ind Vs Eng 1st T20 Live Match

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीरिषभ पंतहार्दिक पांड्यारोहित शर्मा