Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडचा ८ विकेट्स राखून दणदणीत विजय, रोहित शर्माला विश्रांती देणं पडलं महागात

Ind Vs Eng 1st T20 Live Update Score :  इंग्लंड संघानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत सहज विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 10:14 PM2021-03-12T22:14:02+5:302021-03-12T22:18:04+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 1st T20: England win by 8 wickets, take a 1-0 lead in the series | Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडचा ८ विकेट्स राखून दणदणीत विजय, रोहित शर्माला विश्रांती देणं पडलं महागात

Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडचा ८ विकेट्स राखून दणदणीत विजय, रोहित शर्माला विश्रांती देणं पडलं महागात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 1st T20 Live Update Score :  इंग्लंड संघानं पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यांत सहज विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेले ७ बाद १२४ धावांचे माफक लक्ष्य इंग्लंडनं सहज पार केले. जेसन रॉय ( Jason Roy) आणि जोस बटलर ( Jos Buttler) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी ८ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलनं ( Yuzvendra Chahal) यानं इंग्लंडला पहिला धक्का दिला अन् भारताकडून ट्वेंटी-२०त सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान पटकावला. पण, इंग्लंडच्या विजयाचा पाया रचला गेला होता. जेसन रॉयनं ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. डेवीड मलान २४, तर जॉनी बेअरस्टो २६ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडनं ८ विकेट्स व २७ चेंडू राखून सामना जिंकला.  श्रेयस अय्यरनं रोहित शर्माच्या ११ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, विराटच्या नावावर नकोसा पराक्रम

लोकेश राहुल ( KL Rahul) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) ही नवी जोडी सलामीला उतरवण्याचा निर्णय फसला. राहुल ( १), कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) भोपळा आणि शिखऱ धवन ( ४) हे आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतल्यानं टीम इंडिया अडचणीत आली होती. रिषभ पंतनं ( Rishabh Pant) फटकेबाजी करून गाडी रुळावर आणली.  रिषभ २३ चेंडूंत २ चौकार व १ षटकार खेचून २१ धावांवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. हार्दिक २१ चेंडूंत १९ धावा ( १ चौकार व १ षटकार) करून माघारी परतला. Ind Vs Eng 1st T20 Match Today, Ind Vs Eng 1st T20 Live Match  रिषभ पंतचा 'खतरनाक' शॉट; युवराज सिंग म्हणतो, ही जनरेशन बिनधास्त, निर्भय... Video


जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) ४ षटकांत १ निर्धाव षटक टाकून २३ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  Ind vs Eng Live Score Today टीम इंडियाला २० षटकांत ७ बाद १२४  धावांचा समाधानकारक पल्ला गाठता आला. श्रेयस ४८ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६७ धावांवर माघारी परतला. Ind Vs Eng 1st T20 Live Score २० षटकं खेळून भारताची आजची धावसंख्या ही तिसरी निचांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८ बाद ११८ आणि २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ९ बाद १२० धावा केल्या होत्या. भारताकडून चौथ्या क्रमांकावर ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमात युवराज सिंग ( ८) आघाडीवर आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, रोहित शर्मा व मनीष पांडे ( प्रत्येकी ३ ) यांचा क्रमांक येतो. Ind Vs Eng 1st T20 Match Today विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाचक्की, प्रथमच ओढावली अशी नामुष्की

Web Title: Ind vs Eng 1st T20: England win by 8 wickets, take a 1-0 lead in the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.