Hardik Pandya, IND vs ENG 1st T20I Live Updates : आजि हार्दिक पांड्याचा दिनु! ५१ धावा अन् ४ विकेट्स घेत भारताकडून नोंदवला विश्वविक्रम, इंग्लंडचा वाजवला बँड

India vs England 1st T20 I Live Updates : Hardik Pandya च्या अष्टपैलू कामगिरीसमोर इंग्लंडचा बँड वाजला अन् भारताने हा सामना जिंकून मालिकेत १-०अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 02:08 AM2022-07-08T02:08:06+5:302022-07-08T02:08:53+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st T20 I Live Updates : Hardik Panda becomes the first Indian to score 50+ runs and take 4+ wickets in a T20I match, India beat England by 50 runs  | Hardik Pandya, IND vs ENG 1st T20I Live Updates : आजि हार्दिक पांड्याचा दिनु! ५१ धावा अन् ४ विकेट्स घेत भारताकडून नोंदवला विश्वविक्रम, इंग्लंडचा वाजवला बँड

Hardik Pandya, IND vs ENG 1st T20I Live Updates : आजि हार्दिक पांड्याचा दिनु! ५१ धावा अन् ४ विकेट्स घेत भारताकडून नोंदवला विश्वविक्रम, इंग्लंडचा वाजवला बँड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st T20 I Live Updates : आजचा दिवस हा हार्दिक पांड्याचाच ( Hardik Pandya) होता... भारत-इंग्लंड पहिली ट्वेंटी-२० हार्दिकने  ५१ धावांच्या खेळीनंतर ४ विकेट्स घेतल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसमोर इंग्लंडचा बँड वाजला अन् भारताने हा सामना जिंकून मालिकेत १-०अशी आघाडी घेतली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करून जेतेपद जिंकून देत टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या हार्दिकचा खेळ दिवसेंदिवस बहरताना दिसतोय. रोहित शर्माच्या  नेतृत्वाखालील परदेशातील पहिल्याच सामन्यात हार्दिकने छाप सोडली. आजच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करताना हार्दिकने आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम नावावर केला. 

१९८ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्याच षटकात  भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला.  हार्दिक पांड्या त्याच्या पहिल्याच षटकात डेवीड मलान ( २१) व लिएम लिव्हिंगस्टोन ( ०) यांची विकेट घेतली.  ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने जेसन रॉय ( ४) यालाही माघारी पाठवले.  हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचा सोपा झेल सोडला. युजवेंद्र चहलच्या षटकात सूर्यकुमार यादवने सेट झालेल्या मोईन अलीचा झेल सोडला. ब्रूक व अली ही जोडी चांगलीच टिकताना दिसली. पण, चहलने पुढच्या षटकात ही जोडी तोडली. ब्रूकला ( २८) माघारी पाठवताना इंग्लंडला पाचवा धक्का दिला. ब्रूक व अलीने ३६ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली होती. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर चहलने आणखी एक विकेट मिळवली. २० चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावा करणाऱ्या अलीला दिनेश कार्तिकने स्टम्पिंग केले.  


हार्दिकने पुन्हा एक विकेट घेताना सॅम कुरनला ( ४) बाद केले. इंग्लंडचा पराभव इथेच निश्चित झाला होता. हार्दिकने ४ षटकांत ३३ धावा देताना ४ विकेट्स घेतला. ट्वेंटी-२०त एकाच सामन्यात ५०+ धावा व ४ विकेट्स घेणारा हार्दिक हा पहिला भारतीय आणि जगातील पाचवा खेळाडू ठरला. ड्वेन ब्राव्हो ( ६६* व ४-३८ वि. भारत, लॉर्ड्स २००९), मोहम्मद हाफिज ( ७१ व ४-१० वि. झिम्बाव्बे, हरारे २०११), शेन वॉटसन ( ५९ व ४-१५ वि. इंग्लंड, एडलेड २०११) व एस शिनवारी ६१ व ४-१४ वि. इंग्लंड, साउदहॅम्प्टन २०२२) यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच इंग्लंडमध्ये दोनवेळा एकाच ट्वेंटी-२०त चार विकेट घेणाराही तो पहिलाच भारतीय ठरला. यापूर्वी २०१८मध्ये त्याने ३८ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.


 अर्षदीपने पदार्पणातील पहिली विकेट घेताना रिसे टॉपली( ९) याला बाद केले.  चहलने ३२ धावांत २ विकेट्स घेतल्या. अर्षदीपने अखेरच्या षटकात मॅट पर्किनसनची विकेट घेत इंग्लंडला १४८ धावांत गुंडाळले. अर्षदीपने १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना ५० धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.


रोहित शर्माने ( २४) दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर दीपक हुडा ( ३३) , सूर्यकुमार यादव ( ३९)  यांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.  हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५१ धावा करताना ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक झळकावले. दीपक व सूर्यकुमार यांनी मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. हार्दिकने भारताच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. पण, पुन्हा एकदा दिनेश कार्तिकच्या ( ११) आधी अक्षर पटेलला ( १७ ) पाठवण्याच्या निर्णयावर टीका होताना दिसतेय. भारताला अखेरच्या ५ षटकांत ४१ धावा करता आल्या आणि ४ विकेट्स गमावल्या. भारताने ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अली ( २-२६) व ख्रिस जॉर्डन ( २-२३) यांनी चांगली गोलंदाजी केली. 
 

Web Title: IND vs ENG 1st T20 I Live Updates : Hardik Panda becomes the first Indian to score 50+ runs and take 4+ wickets in a T20I match, India beat England by 50 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.