India vs England 1st T20 I Live Updates : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी दोन वेगवेगळे संघ जाहीर केले. पहिल्या ट्वेंटी-२० साठी वेगळा अन् उर्वरित दोन सामन्यांसाठी वेगळा संघ जाहीर केला गेला. पाचव्या कसोटीत सदस्य असलेल्या खेळाडूंना पहिल्या सामन्यासाठीच्या संघात स्थान दिले गेले नाही. आयर्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) पहिल्या ट्वेंटी-२० साठी निवडले, परंतु रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला नाही खेळवले. यावरून नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत.
रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा व इशान किशन ही जोडी सलामीला उतरली. रोहितने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली. सॅम कुरनच्या पहिल्याच षटकात त्याने ९ धावा चोपल्या. त्यानंतर रिसे टोपलेला फटकावले. जोस बटलर याने तिसऱ्या षटकात मोईन अलीला आणले आणि त्यालाही रोहितने सलग दोन चौकार खेचले. पण, अलीने त्याची विकेट घेतली. १४ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने तो २४ धावा करून बाद झाला.
दीपक हुडा फलंदाजीला आला अन् त्यानेही खणखणीत षटकार खेचले. मोईन अलीच्या पुढच्या षटकात दीपकने पुढे येऊन दोन सणसणीत षटकार मारले. पण, अलीने धक्का दिलाच.. इशान किशन ( ८) स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात मॅथ्यू पर्किनसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भारताने पॉवरप्लेमध्ये २ बाद ६६ धावा केल्या आहेत.
नेटिझन्स काय म्हणतायेत?