Hardik Pandya, IND vs ENG 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याचे पहिले अर्धशतक, भारतीय फलंदाजांची जोरदार फटकेबाजी; इंग्लंडसमोर तगडे आव्हान

India vs England 1st T20 I Live Updates : मैदानावर या अन् झोडायला सुरूवात करा... हाच पवित्रा घेत भारतीय फलंदाज मैदानावर उतरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 12:16 AM2022-07-08T00:16:33+5:302022-07-08T00:16:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st T20 I Live Updates : Maiden fifty for Hardik Pandya, India (198/8 in 20 overs) after opting to bat first against England | Hardik Pandya, IND vs ENG 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याचे पहिले अर्धशतक, भारतीय फलंदाजांची जोरदार फटकेबाजी; इंग्लंडसमोर तगडे आव्हान

Hardik Pandya, IND vs ENG 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याचे पहिले अर्धशतक, भारतीय फलंदाजांची जोरदार फटकेबाजी; इंग्लंडसमोर तगडे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st T20 I Live Updates : मैदानावर या अन् झोडायला सुरूवात करा... हाच पवित्रा घेत भारतीय फलंदाज मैदानावर उतरले. कोरोनातून सावरल्यानंतर मैदानावर उतरलेल्या रोहित शर्माने दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर दीपक हुडा, सूर्यकुमार यादव यांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, एकालाही मोठी खेळी साकारता आली नाही. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याला अपवाद ठरला आणि त्याने अखेरपर्यंत फटकेबाजी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला. त्याने ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक याच सामन्यात पूर्ण केले. पण, हार्दिक बाद झाल्यानंतर  भारताच्या धावसंख्या संथ झाली. 


रोहितने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली. पण, तिसऱ्या षटकात मोईन अलीने त्याची विकेट घेतली. १४ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने तो २४ धावा करून बाद झाला. रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त  कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार म्हणून भारतासाठी ट्वेंटी-२०त विराट कोहलीने १५७० धावा, महेंद्रसिंग धोनीने १११२ धावा आणि रोहितने १०११ धावा केल्या आहेत.

दीपक हुडा फलंदाजीला आला अन् त्यानेही खणखणीत षटकार खेचले. मोईन अलीच्या पुढच्या षटकात दीपकने पुढे येऊन दोन सणसणीत षटकार मारले. पण, अलीने धक्का दिलाच.. इशान किशन ( ८) स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. दीपकसोबत सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. ख्रिस जॉर्डनने ९व्या षटकात ही जोडी तोडली. दीपक १७  चेंडूंत ३ चौकार  व २ षटकार मारून ३३ धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्यानेही सुरेख फटके मारले. त्याने सूर्यकुमारसह १८ धावांत ३७ धावा जोडल्या. पुन्हा एकदा जॉर्डनने विकेट मिळवून दिली. त्याच्या बाऊन्सरवर सुर्यकुमार यादव ३९ धावांवर ( १९ चेंडू, ४ चौकार व २ षटकार) झेलबाद झाला. 

हार्दिकची फटकेबाजी सुरूच होती, त्यात तो गोलंदाजाच्या वेगाचा सुरेख वापर करताना गॅपमधून चौकार काढताना दिसला. हार्दिकला ३७ धावांवर बटलरने यष्टिंमागून जीवदान दिले. त्याने स्टम्पिंगची सोपी संधी गमावली. हार्दिक व अक्षर पटेल यांनी ३० चेंडूंत ४५ धावांची भागीदारी केली. अक्षर १७ धावांवर पर्किनसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. आता अखेरची २० चेंडू खेळण्यासाठी दिनेश कार्तिक मैदानावर आल्याने चाहते खूश झाले. हार्दिकने ३० चेंडूंत ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक झळकावले. हार्दिक ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारांसह ५१ धावांवर माघारी परतला. कार्तिकने २०व्या षटकात सलग दोन चौकार खेचले, परंतु टायमल मिल्सने पुढच्या चेंडूवर त्याची विकेट घेतली. सॅम कुरनने परतीचा अप्रतिम झेल टिपला. भारताने ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारली. 

Web Title: IND vs ENG 1st T20 I Live Updates : Maiden fifty for Hardik Pandya, India (198/8 in 20 overs) after opting to bat first against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.