India vs England 1st T20 I Live Updates : कोरोनातून सावरल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) प्रथमच मैदानावर उतरला अन् इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना दिसला. पहिल्याच षटकात त्याने मिड ऑफचा खेळचेला चौकार लाजवाब होता. त्यानंतर पुढच्या षटकात बॅकफूटवर दोन सलग चौकार खेचले. आज काय हा कुणाला ऐकत नाही, असेच चित्र होते. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने मोईन अलीला ( Moeen Ali) गोलंदाजीला आणले. त्यालाही रोहितने स्वीप शॉट मारून सलग दोन चौकार खेचले. पण, अलीने पुढच्याच चेंडूवर पलटवार केला अन् चतुराईने रोहितची विकेट घेतली. यष्टिरक्षक बटलरने सुरेख कॅच घेतली.
रोहित व इशान किशन ही जोडी सलामीला उतरली. रोहितने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली. सॅम कुरनच्या पहिल्याच षटकात त्याने ९ धावा चोपल्या. त्यानंतर रिसे टोपलेला फटकावले. तिसऱ्या षटकात मोईन अलीला आणले आणि त्यालाही रोहितने सलग दोन चौकार खेचले. पण, अलीने त्याची विकेट घेतली. १४ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने तो २४ धावा करून बाद झाला. रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहलीने ३० डावांमध्ये १०००+ धावा केल्या होत्या आणि रोहितने आज ( २९ डाव) तो विक्रम मोडला. सर्वाधिक जलद १००० धावा करणाऱ्या कर्णधारांमध्ये पाकिस्तानचा बाबर आजम ( २६ डाव) अव्वल क्रमांकावर आहे. कर्णधार म्हणून भारतासाठी ट्वेंटी-२०त विराट कोहलीने १५७० धावा, महेंद्रसिंग धोनीने १११२ धावा आणि रोहितने १०११ धावा केल्या आहेत.
दीपक हुडा फलंदाजीला आला अन् त्यानेही खणखणीत षटकार खेचले. मोईन अलीच्या पुढच्या षटकात दीपकने पुढे येऊन दोन सणसणीत षटकार मारले. पण, अलीने धक्का दिलाच.. इशान किशन ( ८) स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात मॅथ्यू पर्किनसनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भारताने पॉवरप्लेमध्ये २ बाद ६६ धावा केल्या आहेत. दीपकसोबत सूर्यकुमार यादवनेही इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडून काढले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी करताना धावांची गती वाढवली. पण, ख्रिस जॉर्डनने ९व्या षटकात ही जोडी तोडली. दीपक १७ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार मारून ३३ धावांवर झेलबाद झाला. भारताचा प्रत्येक फलंदाज आज झोडायच्याच मूडमद्ये होता. हार्दिक पांड्यानेही सुरेख फटके मारले. भारताने १० षटकांत ३ बाद १०५ धावा केल्या.
Web Title: IND vs ENG 1st T20 I Live Updates : Rohit Sharma departs after looking in good touch. He goes for 24 in 14 balls, Moeen Ali strikes, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.