IND vs ENG 1st T20 I Live Updates : ऋतुराज, संजू सॅमसनला संधी नाही मिळणार; जाणून घ्या पहिल्या सामन्यात Playing XI कशी असणार 

India vs England 1st T20 I Live Updates : ८ डिसेंबर २०२१मध्ये रोहितने पूर्णवेळ कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. भारताने आतापर्यंत २ कसोटी, ३ वन डे, ६ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 07:15 PM2022-07-07T19:15:17+5:302022-07-07T19:16:41+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 1st T20 I Live Updates : Rohit Sharma to open with Ishan Kishan, NO PLACE for Sanju Samson, Ruturaj Gaikwad, Playing XI  | IND vs ENG 1st T20 I Live Updates : ऋतुराज, संजू सॅमसनला संधी नाही मिळणार; जाणून घ्या पहिल्या सामन्यात Playing XI कशी असणार 

IND vs ENG 1st T20 I Live Updates : ऋतुराज, संजू सॅमसनला संधी नाही मिळणार; जाणून घ्या पहिल्या सामन्यात Playing XI कशी असणार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 1st T20 I Live Updates : पूर्ण वेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) प्रथमच परदेशात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला मुकणाऱ्या रोहितचे ट्वेंटी-20 मालिकेतून पुनरागमन झाले आहे. ३५ वर्षीय रोहितच्या संघात येण्याचे संजू सॅमसनऋतुराज गायकवाड यांचे आजच्या सामन्यात न खेळणे निश्चित मानले जात आहे. भारत-इंग्लंड पहिला सामना रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. Ageas Blow येथे झालेल्या सामन्यांत भारताला यजमान इंग्लंडला एकदाही पराभूत करता आलेले नाही. येथे भारताने तीन कसोटी व तीन वन डे सामने खेळले आहेत.  

८ डिसेंबर २०२१मध्ये रोहितने पूर्णवेळ कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. भारताने आतापर्यंत २ कसोटी, ३ वन डे, ६ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत. पण, रोहितच्या पुनरागमनाने संजू व ऋतुराज यांचे स्थान धोक्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋतुराज  खेळला होता, तर संजूने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. इशान किशन दोन्ही मालिकेत खेळला होता आणि लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत तो सलामीला खेळला.


दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करून तिसऱ्या क्रमांकावरील दावा मजबूत केला आहे. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक व अक्षर पटेल हे आज प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहेत.  

अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन 
रोहित शर्मा
इशान किशन  
दीपक हुडा
सूर्यकुमार यादव
हार्दिक पांड्या
दिनेश कार्तिक
अक्षर पटेल
हर्षल पटेल
भुवनेश्वर कुमार
युजवेंद्र चहल
आवेश खान/ उम्रान मलिक/ अर्षदीप सिंग  

Web Title: IND vs ENG 1st T20 I Live Updates : Rohit Sharma to open with Ishan Kishan, NO PLACE for Sanju Samson, Ruturaj Gaikwad, Playing XI 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.