India vs England 1st T20 I Live Updates : पूर्ण वेळ कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) प्रथमच परदेशात भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीला मुकणाऱ्या रोहितचे ट्वेंटी-20 मालिकेतून पुनरागमन झाले आहे. ३५ वर्षीय रोहितच्या संघात येण्याचे संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड यांचे आजच्या सामन्यात न खेळणे निश्चित मानले जात आहे. भारत-इंग्लंड पहिला सामना रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. Ageas Blow येथे झालेल्या सामन्यांत भारताला यजमान इंग्लंडला एकदाही पराभूत करता आलेले नाही. येथे भारताने तीन कसोटी व तीन वन डे सामने खेळले आहेत.
८ डिसेंबर २०२१मध्ये रोहितने पूर्णवेळ कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एकही पराभव पत्करावा लागलेला नाही. भारताने आतापर्यंत २ कसोटी, ३ वन डे, ६ ट्वेंटी-२० सामने जिंकले आहेत. पण, रोहितच्या पुनरागमनाने संजू व ऋतुराज यांचे स्थान धोक्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऋतुराज खेळला होता, तर संजूने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन केले होते. इशान किशन दोन्ही मालिकेत खेळला होता आणि लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत तो सलामीला खेळला.
अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन रोहित शर्माइशान किशन दीपक हुडासूर्यकुमार यादवहार्दिक पांड्यादिनेश कार्तिकअक्षर पटेलहर्षल पटेलभुवनेश्वर कुमारयुजवेंद्र चहलआवेश खान/ उम्रान मलिक/ अर्षदीप सिंग