India vs England 1st T20 I Live Updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना आज साऊथहॅम्प्टन येथे रात्री १०.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) चे पुनरागमन होत असल्याने भारतीय चाहते आनंदात आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णवेळ हाती घेतल्यानंतर परदेशातील ही रोहितची पहिलीच मालिका आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी हिटमॅनही सज्ज झाला आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रोहितला पाचवी कसोटी खेळता आली नव्हती. पण, आता ट्वेंटी-२० मालिकेत इंग्लंडचा नवा कर्णधार जोस बटलर याला टफ फाईट देण्यासाठी तो तयार आहे.
एक मालिका झाली नाही की, ही लोकं विश्रांती मागतात!; विराट कोहली, रोहित शर्मावर सिलेक्टर, BCCI नाराज
कसोटीत खेळणाऱ्या खेळाडूंना या पहिल्या लढतीसाठी विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे विराट कोहली, जसप्रीत बुमराह व रिषभ पंत हे या सामन्याचा भाग नसतील. अशात दीपक हुडा, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक हे प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. राहुल त्रिपाठी व अर्षदीप सिंग यांनाही आज पदार्पणाची संधी आहे. उर्वरित दोन ट्वेंटी-२० साठीच्या संघात त्यांना वगळण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव दुखापतीतून पुनरागमन करणार आहे. उम्रान मलिकला आज रोहित संधी देतो का याची उत्सुकता आहे. भुवनेश्वर कुमार व हर्षल पटेल हे संघात दिसतीलच.. युजवेंद्र चहल याचेही प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन अपेक्षित आहे.
एवढी सगळी उत्सुकता असताना हवामान काय म्हणतंय?हवामानाच्या अंदाजानुसार भारत-इंग्लंड यांच्यातल्या पहिल्या सामन्यात पाऊस व्यत्यय घालण्याची शक्यता कमी आहे. ७ जुलैला ढगाळ वातावरण असेल.दिवसा तापमान १२ ते २५ डिग्री सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.
संभाव्य संघ
- भारत- रोहित शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, आवेश खान
- इंग्लंड - जोस बटलर, जेसन रॉय, डेवीड मलान, लिएम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, रिसे टॉपले, टायमल मिल्स, मॅथ्यू पर्किनसन