Ind Vs Eng T20 Live Update Score : फिरीकपटू आदील राशीदला पहिलं षटक देऊन इंग्लंडनं त्यांची रणनीती स्पष्ट केली होती. त्यात जोफ्रा आर्चरनं दुसऱ्याच षटकात टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) माघारी पाठवले. आर्चरच्या त्या षटकात कर्णधार विराट कोहलीलाही ( Virat Kohli) अवघड गेलं. त्यात तिसऱ्या षटकात राशीदच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो सोपा झेल देऊन माघारी परतला. भारताचे दोन फलंदाज ३ धावांवर बाद झाले. कोहलीला भोपळाही फोडता आला नाही आणि त्याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. ( First time Virat Kohli got out for two consecutive Ducks in International Cricket)
- जून २०१८ नंतर खेळलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २६ डावांमध्ये विराट कोहली आज प्रथमच भोपळ्यावर माघारी परतला.
- ट्वेंटी-२० क्रिकेटमधील पहिल्या ८० डावांत सर्वाधिक ३ वेळा भोपळ्यावर माघारी परतण्याच्या इयॉन मॉर्गनच्या विक्रमाशी विराट कोहलीनं बरोबरी केली. महेंद्रसिंग धोनी, शोएब मलिक प्रत्येकी १ वेळा भोपळ्यावर बाद झाले होते.
- २०२१ मध्ये सर्वाधिक ३ वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही विराटनं नावावर केला. जॉनी बेअरस्टो, कुसल मेंडिस आणि अॅनरिच नॉर्टझे हेही तीन वेळा भोपळ्यावर बाद झाले आहेत.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद होण्याची विराटची पहिलीच वेळ ठरली.